समाजाने संतजीवनाचा अभ्यास करणे हि या घडीची गरज आहे. आचार्य डॉ शुभम महाराज कांडेकर
किशोर भगत
बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद बनामध्ये संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतीथी निमीत्त आयोजीत क्षेत्र माहात्म कथा "श्री केशव गोविन्द महात्म्य " या संगीतमय कथेस प्रचंड प्रतिसाद लाभला. गुरुवार १३ जुलै ते १७ जुलै पर्यंत आयोजित या कथेचे प्रवक्ते आचार्य डॉ शुभम महाराज कांडेकर यांनी पद्मपुराण, स्कंद पुराण, लिंग पुराण, शिव महापुराण इत्यादी पुराणातून आलेला बिल्वपुरीचा (बेलापूरचा) महिमा, श्री केशव गोविंद भगवंताची स्थापना , प्रवरा नदीची उत्पत्ती, प्रवरा नदिवर बेलापूर पंचक्रोशीत विविध देवतांनी स्थापन केलेली शिवलिंग इत्यादीचा पुराणात असलेला उल्लेख कथा स्वरुपात भाविकां समोर मांडला. आपणा सर्वांचे थोर भाग्य व पूण्य आहे की आपण या क्षेत्रात जन्माला आलो असे भावपूर्ण उदगार त्यांनी या वेळी काढले . साक्षात महादेव शंकर ,पार्वतीमाता, श्रीहरी विष्णु, इंद्र ब्रम्हदेव इत्यादिंच्या पदस्पर्शाने व लिलाद्वारे पुनित झालेल्या या भूमीचे जतन व संवर्धन करण्यासाठी संत नागू डांग केशवदास महाराज , परमहंस विद्यानंद स्वामी इत्यादी संतांनी आतोनात प्रयत्न केले. सध्याच्या युगातील धकाधकीमुळे समाज, जीवन जगण्याचा आनंद व समाधान गमावून बसला आहे. येणा-या पिढीनां सुखी होण्यासाठी पुन्हा एकदा या सर्व क्षेत्रांचे महात्म्य समजून घेण्याची गरज आहे. ईश्वरावर विश्वास व आहे त्या परिस्थीतीत समाधानी राहणे या संतांची शिकवणीची आज नितांत गरज आहे आणी यासाठी संतचरित्रांचा अभ्यास तरुणांनी करण्याची गरज आहे असे प .पू शुभम महाराज कांडेकर यांनी यावेळी सांगितले. या ४ दिवसीय 'कथेस भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला . श्रीहरिहर केशव गोविंद संस्थान, बन यांनी कथेसाठी प्रशस्त हॉल उपलब्ध करुन दिला. यामुळे रोज सुमारे ६००-७०० लोकांनी या कथेला हजेरी लावली.
सोमवारी ह. भ. प. बाबानंद महाराज विर यांचे काल्याच्या किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. बाबानंद महाराजांनी या वेळी या उपक्रमाचे फार कौतुक केले. श्री केशव गोविद देवतेची महती सामान्य जनते समोर ग्रंथ रुपाने सहज सोप्या भाषेत प .पू मोहनबुवा खानवेलकर यांनी ग्रंथ रचना करून ''सामान्यं जनापर्यंत केशव गोविन्द पोहोचवले असेही गौरव दगार या प्रसंगी विर महाराजांनी काढले . तुज आहे तुजपाशी या उक्तीप्रमाण महाराजांनी केशव गोविंद या देवतेची महती अधोरेखित केली .या प्रसंगी श्री केशव गोविंद संस्थानने भाविकांसाठी महाप्रसादाची वाटप केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केशव गोविंद संस्थान, केशव गोविंद उत्सव समीतीच्या कार्यकर्यत्नी परिश्रम घेतले.