शिवसेना - भाजपा पक्षाच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेत ठिय्या देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर .
शिवसेना-भाजपा पक्षाच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेत ठिय्या देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर
नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या दालनात शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने ठिय्या देत राहुरी शहरातील अडचणीन विषयी पाढा वाचत नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे,भाजपाचे प्रफुल्ल भैय्या शेळके,गणेश खैरे,सचिन मेहेत्रे, तनपुरे,प्रशांत खळेकर,महेंद्र उगले,शिवनाथ सत्रे,ज्ञानेश्वर सप्रे,आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना ता.अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरत राहुरी शहरातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली.पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून नागरिक स्वखर्चातून गटारीवरील तुटलेले ढापे टाकत आहेत.गणेश मंडळांसमोरील उखडलेले रस्ते बुजविण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.कॉलेज रोड,ब्लड बँक रस्ता ते डॉ.कोरडे दवाखाना रस्ता,डॉ.खुरुद दवाखाना समोरील भराव या ठिकाणी प्रचंड दैना अवस्था झालेली असतांना वेळोवेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी तात्काळ कामे मार्गी लावण्याचे सांगून देखील काम होत नसल्याबाबत मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास श्री.लांबे यांनी आणून दिले.
प्रफुल भैय्या शेळके यांनी राहुरी शहरात नव्याने झालेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्ज्याची झालेली आहे त्याची चौकशी करून त्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. काळे आखाडा,येवले आखाडा,महात्मा चौक परिसरातील अडचणीन विषयी शेळके यांनी तक्रारींचा पाढा वाचला.
शिवसेना - भाजपाच्या वतीने नगर पालिका प्रशासनास पत्र देण्यात आले त्या पत्रात म्हंटले आहे कि, नुकतेच राहुरी शहरामध्ये राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत राहुरी शहरात भुयारी गटार योजने करिता रक्कम १३४ कोटी ९८ लक्ष निधी देण्यात आलेला आहे.त्या पैकी रक्कम .९२ कोटी ९८ लक्ष निधीच्या कामाला सुरवात करण्यात आलेली आहे. राहुरी शहरातील भुयारी गटार योजनेचे काम उत्कृष्ट व्हावे व या कामाचे स्वरूप राहुरी शहरातील नागरिकांना अवगत व्हावे या दृष्टीने राहुरी शहरात किमान १० ठिकाणी प्रथमदर्शनी भागामध्ये भुयारी गटार योजनेचे अंदाजपत्रक (Estimete) व कामाचे मोजमाप पत्रक फ्लेक्स बोर्ड लावून प्रसारित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.अंदाजपत्रक (Estimete) व कामाचे मोजमाप पत्रक फ्लेक्स बोर्ड लावून प्रसारित केल्याने कामामध्ये पारदर्शकता येवून नागरिकांना देखील शासनाद्वारे जनतेच्या सोयीसाठी राबवत असलेल्या योजनेची माहिती मिळून जनता स्वतः होत असलेल्या कामावर बारकाई लक्ष ठेवून उत्कृष्ठ काम होईल.पत्राची दखल न घेतल्यास सदरील कामात हलगर्जी पणा झाल्याचे निदर्शनास आल्यास राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दोषी धरून कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
या प्रसंगी सुजय काळे,शरद येवले,उमेश शेळके,मधुकर पोपळघट,रोहित नालकर,अरुण जाधव,मिलिंद हरिश्चंद्र,अविनाश शिरसागर आदी उपस्थित होते.
या पत्राचा प्रत मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे,पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,खा.सदाशिव लोखंडे खा.सुजय दादा विखे पाटील मा.जिल्हाधिकारी,मा.अप्पर जिल्हाधिकारी,शिर्डी,मा.तहसिलदार यांना देण्यात आलेल्या आहे.