सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी अन्यथा भीम आर्मी यांच्यावतीने बेमुदत उपोषण

सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी अन्यथा भीम आर्मी यांच्यावतीने बेमुदत उपोषण

सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी, अन्यथा २३ डिसेंबर रोजी बेमुदत उपोषण.*

*राहुरी प्रतिनिधी- डॉ देवेंद्र शिंदे*

राहुरी विद्यापीठात येथे जुलै महिन्यात एका बांधकाम कामगाराच्या अंगावर पायऱ्यांचा स्लॅब कोसळून तो जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार कारवाई करण्यासाठी भिम आर्मीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. मात्र सदर प्रकरणाची अद्याप कोणतीच चौकशी झालेली नसून सदर प्रकरण दडपल्याचा आरोप करुन सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी २३ डिसेंबर रोजी उपोषण करण्यात येणार आहे.

भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पँथर ऋषी पोळ व विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक साळवे यांनी आज दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे कि, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मध्यवर्ती परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब अंबेडकर बहुउद्देशीय भवनाचे काम चालु असताना अपघात होऊन एका परप्रांतीय मजुराचा पायऱ्यांच्या स्लॅब खाली दबुन मृत्यु झाल्याची घटना २६ जुलै २०२५ रोजी घडली होती. 

सदर ठेकेदाराने हे काम करत असताना निकृष्ठ दर्जाचे बांधकाम सहित्य वापरल्याने हा पायऱ्यांचा स्लॅब कोसळला होता. याबाबत पँथर ऋषी पोळ व दिपक साळवे यांनी विद्यापीठ कार्यालयाकडे तक्रार केली होती. परंतु सदर तक्रारीचा कोणत्याही प्रकारे विचार न करता सदर प्रकरण दाबुन टाकणे बाबत विद्यापीठ प्रशासनाने तक्रारीचे दखल घेतली नाही.

त्यानंतर विद्यापीठ कार्यालया समोर उपोषण करण्या बाबतचे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलसचिव यांनी बांधकाम विभागाचे विद्यापीठ अभियंता यांना या बाबत कळवुन झालेल्या प्रकाराची चौकशी करुन अहवाल सादर करणे बाबत सुचित केले होते. परंतु विद्यापीठ अभियंता यांनी कोणतीही दखल न घेता कुलसचिव यांच्या नमुद पत्रास केराची टोपली दाखविली व अपघात झाल्या प्रकरणाची कोणतीही शाहनिशा, चौकशी दखल घेतली नाही व सदर अपघात प्रकरण पाठीशी घातल्याचे दिसुन येत आहे.

विद्यापीठ प्रशासन तसेच बांधकाम विद्यापीठ अभियंता यांनी सदर तक्रारी बाबत टाळाटाळ केल्याने पँथर ऋषी पोळ व दिपक साळवे हे दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी विद्यापीठ कार्यालया समोर बेमुदत उपोषणास बसत आहे. उपोषणा दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास अगर उपोषण कर्त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास संबंधीत कार्यालय व तेथील अधिकारी जबाबदार राहतील, असे निवेदनात म्हटले आहे.