*मुळा पाटबंधारे विभागामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप ;माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने उपविभागीय अधिकार्‍यावर कारवाईची मागणी.*

*मुळा पाटबंधारे विभागामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप ;माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने उपविभागीय अधिकार्‍यावर कारवाईची मागणी.*

मुळा पाटबंधारे विभागामध्ये नित्कृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप ; माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

 

  मुळा पाटबंधारे विभागांतर्गत उजवा कालवा व मुळा डावा कालवा परिसरात कार्यारंभ २०२४-२५ या कालावधीत झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या कामांची पडताळणी केली असता निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर यांनी केला आहे . यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवूनही संबंधित कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.मुळा पाटबंधारे विभागात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निदर्शनास येताच या कामासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवूनही संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याला पायदळी तुडवत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे .

संबंधित प्रकरणाकडे नेवासा तालुक्याचे लक्ष वेधले असून या प्रकरणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे . मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जाणीवपूर्वक माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहितीही दिली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.राहूरी, नेवासा, चिलेखणवाडी, घोडेगाव, अमरापूर या परिसरात कामे न करता बोगस बिले काढली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती न दिल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे .

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार की यांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .