02/05/2026 राहुरी पोलीस स्टेशनला डायल 112 वर खोटी माहिती देणारे इसमावर गुन्हा दाखल
02/05/2026 राहुरी पोलीस स्टेशनला डायल 112 वर खोटी माहिती देणारे इसमावर गुन्हा दाखल
आरोपी नामे बाबासाहेब मिठू शिंदे वय. 35 वर्षे रा कात्रड ता. राहुरी जि. अहिल्यानगर याने दिनांक 02/05/2026 रोजी 16/50 वाजेचे सुमारास डायल 112 वर कात्रड ता. राहुरी येथे वाद झाले असून मारहाण करण्यासाठी लोक आलेले आहेत.त्यांचेकडे काठ्या कोयते आहेत त्यावरून खात्री करण्यासाठी सदर ठिकाणी डायल 112 अंमलदार पोहेकॉ /सुनील निकम पोना /अशोक कुदळे अशांनी जाऊन खात्री केली त्या ठिकाणी कोणतेही वाद झाले नसल्याचे तसेच सदर आरोपी हा दारूचे नशेत मिळून आला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारूचे अमलामध्ये असले बाबत अभिप्राय दिला आहे. सदर प्रकारा बाबत पोना /अशोक कुदळे यांनी सदर आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. यापुढे डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध असेच गुन्हे दाखल केले जातील.
सदर कारवाई मा. मुम्मका सुदर्शन पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात पो हे काॅ सुनील निकम व पोलीस नाईक अशोक कुदळे यांनी केली आहे.

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे








