नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद.
खेडले परमानंद प्रतिनिधी दि 19
नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी 2,18,500/- रुपये किंमतीच्या साधनासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब,. स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी दिनेश आहेर अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते.
या आदेशा प्रमाणेदिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/रोहित मिसाळ, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड व पोलीस चालक कॉन्स्टेबल उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या होत्या.
नमुद सुचना प्रमाणे पथक नेवासा परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक. दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, खडकाफाटा, ता. नेवासा येथील सिमेंट पोल फॅक्टरी जवळ काही इसम मोटार सायकलीसह कोठेतरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत रस्त्याचे कडेला अंधारात बसलेले आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ व पंचाना सोबत घेवुन नमुद ठिकाणी जावुन वाहन रस्त्याचे कडेला लावुन पायी चालत बॅटरीचे उजेडात खात्री केली असता काही इसम अंधारात दबा धरुन बसलेले दिसले पोलीस पथकाची चाहुल लागताच सदर संशयीत इसम पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन चार (04) इसमांना ताब्यात घेतले व दोन (02) संशयीत इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) किरण बाळु काळे, वय 19, रा.बाळापुर बोलेगांव, ता. गंगापुर, , 2) रामेश्वर जंगल्या भोसले, वय 26, रा. पांडेगव्हाण, आष्टी जिल्हा बीड 3) अभिक ऊर्फ महाडीक बंड्या भोसले वय 21, रा. बोलेगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 4) स्वरुप ऊर्फ गुंड्या डिचार्ज काळे वय 24, रा. अंतापुर, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमाचे नाव 5) अरुण काळे (फरार) व 6) तीनताश्या खंडु काळे दोन्ही रा. बोलेगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर (फरार) असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत एक तलवार, एक एअरगन व लाकडी दांडके मिळुन आल्याने हत्याराबाबत त्यांचेकडे अधिक विचारपुस करता संशयीत इसम नेवासा परिसरात शेतवस्तीवर जावुन कोठेतरी दारोडा घालण्याचे तयारी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास करुन त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे व किती ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अगर चोरीचे गुन्हे केली आहे. याबाबत विचारणा करता त्यांनी नेवासा परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदरच्या या दमदार कारवाईमुळे अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देऊन दरोडे जबरी चोरी अशा विविध गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.