*म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारी यांच्या सतर्कतेने ट्रकची मोठी हानी टळली.*
राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पंजाब वरून बेंगलोर कडे बटाटा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या मागील टायरला अचाणक आग लागली होती . सकाळ सत्रातील कंत्राटी-सुरक्षा रक्षक आनिल नजन हे आपली विद्यापीठ सेवेची नोकरी बजावत होते .विद्यापीठ प्रमुख प्रवेश द्वारा जवळ सकाळसत्रात वाहनांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरु असते . शाळेच्या स्कुलबस येणेसाठी गर्दी कमी करणे करता सुरक्षा रक्षक नियमित आपले कर्तव्य बजावत असतांना ट्रकच्या मागील टायरला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले .

ट्रक पेटून मोठे नुकसान होईल तसेच रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जाम होईल म्हणून त्यांनी लगेच सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला व घटणेची माहिती कळवली . विलंब न लावता त्वरीत सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व त्यांच्या सोबत सुरक्षा पर्यवेक्षक राहुल पवार दत्ता आडसुरे , तुषार गिरगुणे,रवि येणारे , कल्याण मेटे,गोरक्षनाथ भालेराव, सुरक्षा रक्षक अभिजित शिंदे,सचिन गवते,आनिल नजन,अक्षय येणारे या सर्वांनी घटणास्थळी धाव घेतली .

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारा नजीक आग नियंत्रन बंबासह नगर - मनमाड हायवेवर धाव घेत सदर बटाटे घेऊन जाणारा ट्रक क्र RJ 14 GJ 5023 याच्या मागील टायरने घेतलेला पेट विझवून मोठी हानी टाळली .सुरक्षा अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे विद्यापीठ पंचक्रोशीमध्ये सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे .








