नेवासा परिसरात मंदीर चोरी व घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी 57,500/- रुपाये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद 5 गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

नेवासा परिसरात मंदीर चोरी व घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी 57,500/- रुपाये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद 5 गुन्हे उघड,  स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

नेवासा प्रतिनिधी //

नेवासा परिसरात मंदीर चोरी व घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी 57,500/- रुपाये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद 5 गुन्हे उघड,

स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

  याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की सुभाष एकनाथ चव्हाण वय 68 नेवासा खु, ता. नेवासा यांनी दिनांक 01/01/24 रोजी अनोळख्या इसमांनी औदुंबर चौक, नेवासा खु येथील दुर्गादेवी मंदीराच्य गेटचे कुलूप तोडुन मंदीरात जावुन 11,000/- रुपये किंमतीची दानपेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरुन नेली बाबत नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 02/2024 भादविक 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन राकेश ओला , पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

 नमुद आदेशान्वये पोनि. दिनेश आहेर यांनी दिनांक 10/01/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, संदीप दरदंले, फुरकान शेख, पोकॉ/किशोर शिरसाठ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ अरुण मोरे अशांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

                 पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे आकाश ऊर्फ मलिंगा जगधने रा. गंगानगर, ता. नेवासा याने त्याचे साथीदारासह सदरचा गुन्हा केला असुन, तो ज्ञानेश्वर कॉलनी मागे काटवनात बसलेला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पहाणी करता बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन संशयीत इसम झाडा खाली बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच दोन्ही संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने वय 22, व 2) विशाल अरुण बर्डे दोन्ही रा. गंगानगर, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे 3) अमर बर्डे (फरार) व 4) बंटा ऊर्फ सौरभ (फरार) दोन्ही रा. गंगानगर, ता. नेवासा यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख व विविध कंपनीचे 4 मोबाईल फोन असा एकुण 57,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.   

ताब्यातील आरोपींकडे मुद्देमालाबाबत चौकशी करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवुन लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी नेवासा परिसरात खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने एकुण 5 गुन्हे उघडकिस आलेले आहेत ते खालील प्रमाणे -

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. नेवासा 52/23 भादविक 457, 380

2. नेवासा 817/23 भादविक 454, 457, 380

3. नेवासा 953/23 भादविक 457, 380

4. नेवासा 1128/23 भादविक 457, 380

5. नेवासा 02/24 भादविक 457, 380

आरोपी नामे आकाश ऊर्फ मलिंगा कचरु जगधने हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण - 19 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. नेवासा 230/2015 भादविक 457, 380

2. नेवासा 224/2015 भादविक 457, 380, 511

3. नेवासा 189/2015 भादविक 457, 380

4. नेवासा 275/2015 भादविक 326, 143

5. नेवासा 167/2015 भादविक 457, 380

6. नेवासा 297/2016 भादविक 394

7. नेवासा 183/2017 भादविक 457, 380

8. नेवासा 206/2017 भादविक 457, 380

9. नेवासा 229/2017 भादविक 380

10. नेवासा 279/2017 भादविक 457, 380

11. नेवासा 136/2017 भादविक 457, 380

12. नेवासा 118/2018 भादविक 394

13. नेवासा 377/2018 भादविक 143, 324

14. नेवासा 27/2018 भादविक 379

15. नेवासा 191/2019 भादविक 399, 402

16. नेवासा 18/2019 भादविक 380

17. नेवासा 947/2020 भादविक 379

18. श्रीरामपुर शहर 200/2019 भादविक 457,380

19. एमआयडीसी, वाळुंज छ.संभाजीनगर 216/2022 मपोका 122

ताब्यातील दोन्ही आरोपींना मुद्देमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे..