अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस २ वर्ष सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.
‘ अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा '
अहमदनगर : आरोपी नामे रेहान उर्फ मोहम्मद अंजर रिजवान शेख , वय - १ ९ वर्षे , रा . शेंडी ता . जि . अहमदनगर याने पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . पी . आर . देशमुख साहेब , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीस भा.दं.वि. कलम ३६३ नुसार दोषी धरून २ वर्षे सक्त मजुरी व रूपये ५,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ११ व १२ नुसार दोषी धरून आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी व रूपये ५,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक १८.०६.२०२२ रोजी फिर्यादी यांनी त्यांची मुलगी वय वर्षे १४ हि घरातून निघून गेलेबाबत भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती . त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी भा.द.वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला . त्यानंतर पो.हे. कॉ . गोर्डे यांनी घटनेचा तपास करून पिडीत मुलीचा पोलिसांनी शोध घेतला असता , ती आरोपी नामे रेहान उर्फ मोहम्मद अंजर रिजवान शेख याचे सोबत मिळून आली . पोलिसांनी तिचा जबाब घेतेवेळी तिने सांगितले की , आरोपीने मला बळजबरीने तुझ्याशी लग्न करावयाचे आहे माझे बरोबर चल असे म्हणून तिला नातेवाईकाचे घरी घेवून गेला . तिथे राहत असताना तिचा विनयभंग केला असल्याची माहिती तिने दिली . पिडीत मुलीचा जबाब घेतल्यानंतर पिडीत ही अल्पवयीन असल्याने सदर गुन्हयामध्ये वाढीव कलम लावण्यात आले . त्यानंतर घटनेचा संपूर्ण तपास पोलिस पोलिस उपनिरीक्षक एम . के . बेंडकोळी यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीत मुलीचे वडील , पंच साक्षीदार, तपासी अधिकारी , वयासंदर्भात मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आर . व्ही . बोर्डे यांनी सहकार्य केले . अहमदनगर
ता . ०४/०५/२०२३
( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
विशेष सरकारी वकील , अहमदनगर .
मो . ९ ८५०८६०४११,८२०८ ९९ ६७ ९ ५ -