श्रीरामपूर तालुक्यात चंदनचोर जोमात.... प्रशासन मात्र गेले कोमात. .!!!
प्रशांत राजे शिंदे
श्रीरामपूर..
श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या अनेक गावांमध्ये चंदन चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घालून गोंधळ माजवला असल्याचं दिसून येत आहे. श्रीरामपूर तालुक्यामध्ये असणाऱ्या अनेक गावांच्या वाड्या - वस्त्यावर शेतामध्ये, अनेकांच्या शेतावरील बांधावर, घरासमोर चंदनाचे झाडे आलेली आहेत.अनेक वर्षे जपून मात्र या चंदनाच्या झाडावर चंदन चोरांनी डल्ला मारण्याच काम जोमाने सुरू केलेलं आहे.अशा चंदन चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत.तक्रार दाखल होऊनही प्रशासनाचा तपास मंद गतीने चालू आहे.
श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या अनेक गावांमध्ये सध्या चंदन चोराने अक्षरशः धुमाकूळ घालून चंदनाच्या झाडांच्या चोरीच्या आणि घटना समोर येत आहेत.मात्र प्रशासनाचा कारवाईचा बडगा नको म्हणून अनेकांनी तक्रारी दाखल केलेल्या नाहीत.त्यामुळे या घटना समोर येत नाहीत. गेल्या चार दिवसापासून चंदन चोरांनी अनेक ठिकाणी चंदनाच्या झाडांची रात्रीच्या सुमारास चोरी करून धुमाकूळ घातला आहे. प्रशासनाला या चंदन चोराची अगोदरच माहिती असून देखील कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रशासना विषयी त्रिव्र प्रकारची नाराजी व्यक्त केली जात आहे.श्रीरामपूर परिसरा लगत असलेल्या चिन्धे वस्ती, जगतापवस्ती,भोकर,खोकर, निपाणी वडगाव,कारेगाव, अशोकनगर अशा अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या वस्त्या व शेती असून या ठिकाणी बांधाच्या कडेला घराच्या समोर अनेक जणांच्या चंदनाचे झाड आलेली आहेत.रात्रीच्या वेळेला या चंदन चोराच्या टोळ्या अंधाराचा फायदा घेऊन उच्च प्रतीच्या चार चाकी गाड्या तसेच उच्च प्रतीचा पेहराव वापरून अगोदर रेकी करून मग मध्यरात्रीच्या दरम्यान चंदनाची झाडे चोरून नेण्याचे प्रकार सर्रासपणे करीत आहेत.झालेल्या घटनेच्या प्रकाराबद्दल पोलिसाचा कुठल्याच प्रकारच्या कारवाईचा बडगा नको म्हणून बहुतेक जणांनी कारवाई करण्याचे टाळत आहेत.आत्ताच ताज्या घटनेनुसार संजयनगर येथील पेशाने वकील असणारे अँड. श्री.प्रशांत काळे यांच्या शेतातील तीन चंदनाची झाडे चोरीला गेली आहे . तसेच अशोकनगर येथील दिल्ली 91 भारतीय पत्रकार संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रशांतराजे शिंदे यांच्या घराला सर्व बाजूने तारिचे भक्कम कंपाऊंड केलेले असून चंदन चोरांनी तार कटर च्या साह्याने तारेची जाळी कट करून घरासमोरील असणारे पंचवीस वर्षांचे जपलेले चंदनाचे झाड देखील आदल्या रात्री चोरी करुन घेऊन गेले आहेत.प्रशांतराजे शिंदे यांनी समक्ष पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेची माहिती दिली होती.परंतु प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स न मिळाल्याने या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.श्रीरामपूर तालुक्यात तसेच अनेक खेड्यालगत या चंदन चोराच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चंदनचोर टोळ्यांची माहिती पोलीस प्रशासनाला असून देखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? चंदन चोरी टोळ्यांना पोलिसांचे अभय का आहे ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उत्पन्न होत आहेत. जर या चंदनचोर टोळ्यांवर कारवाई झाली नाही तर नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत असे अनेक गावामधल्या नागरिकांकडून बोलले जात आहे.