*पोलिस निरीक्षक संजय ठेंगे ॲक्शन मोडवर चुकिला माफी नाही, राँग साईडने वाहन चालवणाऱ्या 7 वाहनांवर दंडात्मक कारवाई* .

*रॉंग साईड वाहन चालवणाऱ्या सुमारे 7 वाहनांवर दंड,3 ट्रक चालवणारे चालकास राहुरी पोलिसांनी पाठवले मां न्यायालयात*
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत येथे वारंवार ट्राफिक जाम होत असून सदर जामचे मूळ कारण हे बरेचसे वाहन चालक हे थोडेही ट्राफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड डिव्हायडर मधून रॉंग साईडने गाड्या टाकतात व त्यामुळे तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो.
आज सुमारे 12.30 चे सुमारास शनिशिंगणापूर फाटा ते राहुरी खुर्द दरम्यान ट्राफिक जाम झाल्याने एकूण दहा वाहनांनी रॉंग साईट धोकादायक पद्धतीने गाड्या घातल्या ज्यामुळे अधिकच ट्राफिक जाम झाल्याने सुमारे सातवाहनांवर दंडात्मक कारवाई करून सात हजार रुपये दंड वसूल केला. त्यामध्ये युनियन बँकेचे कॅश वाहन क्रमांक MH 12 UM 5855 या वाहनावर सुद्धा 1500/- रुपये दंड आकारण्यात आला.
ट्रक क्रमांक MH 17 CV 8386 चालक सचिन केशव जोशी राहणार बेलापूर, ट्रक क्रमांक RJ 14 GK 3052 चालक नजीम आशु खान राहणार जिजारा जिल्हा आलवर, राज्यस्थान ट्रक क्रमांक KA 42 B 5577 चालक परशुराम कृष्णा पवार राहणार सुसुर जिल्हा सादगीर कर्नाटक अशा तीन ट्रक चालकांवर MVA 184 प्रमाणे कारवाई केली. *सदर कारवाई चे अनुषंगाने सदर चालकांना मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहुरी यांचे न्यायालयात पाठविण्याची तजवीज ठेवलेली आहे.*
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आव्हान केले की कोणीही रॉंग साईड गाडी टाकून वाहतूक जाम करू नये.तसेच वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी तथा राहुरी शहरात केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, पोलीस हवालदार फुलमाळी, चालक शकूर सय्यद,सचिन ताजणे यांच्या पथकाने केली. वरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात करण्यात आली.