युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा शिक्षणरत्न पुरस्कार सागर बनसोडे सर यांना जाहीर

युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा शिक्षणरत्न पुरस्कार सागर बनसोडे सर यांना जाहीर

युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा शिक्षणरत्न पुरस्कार

सागर बनसोडे यांना जाहीर 

 

   बालाजी देडगाव ( प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक,कृषी , वैद्यकीय, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीचा युवा शिक्षणरत्न पुरस्कार बालाजी देडगाव येथील रहिवाशी व गोंडेगाव येथील हनुमान माध्यमिक विद्यालय चे उपक्रमशील शिक्षक सागर बनसोडे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळेयांनी दिली.

       सागर बनसोडे यांनी गेली १६ पासुन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा शिक्षकरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते व ज्येष्ठ साहित्यीक, विचारवंत सुभाष सोनवणे, ॲड. हिंमतसिंह देशमुख, युवा नेते अब्दुल शेख, अशोक पाटील , बजरंग पुरी आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. असे प्रतिष्ठाणचे सचिव प्रा. सुनिल पंडित यांनी सांगितले . या पुरस्कार प्राप्ती बद्दल बालाजी देडगाव व गोंडेगाव परिसरातून अध्यापक सागर बनसोडे यांचे अभिनंदन होत आहे.