शेवगाव तालुक्यातील अनेक गावाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेवगाव तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
शेवगाव (प्रतिनिधि) शेवगाव तालुक्यातील अनेक गावांचा शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झालेला असून हा शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी गहीले वस्ती,माळीवाडा, दादेगांव,खुंटेफळ या शिष्टमंडळाने शेवगाव तहसील कार्यालयात सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले.
याबाबत सविस्तर वृत्त कि, तालुक्यातील दादेगांव, खुंटेफळ,घोटण,तळणी या भागासह शेवगाव शहरातील माळीवाडा,खुंटेफळ रोड, गहीले वस्ती या भागाचा शेतीपंपाचा वीजपुरवठा गेल्या आठ दिवसापासून खंडीत झालेला असून यामुळे या परिसरातील शेतक-यांची उभे पिके पाण्याअभावी जळण्याच्या अवस्थेत आहेत. अगोदरच पावसाने दडी मारल्याने हातातोडांशी आलेली ही पिके या खंडीत वीजपुरवठ्याने वाया जाणार असल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे.याचाच रोष व्यक्त करत आज परिसरातील शेतक-यांनी थेट तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या कार्यालयात सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी आंदोलक शेतकरी व वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री.लोहारे यांच्यात चर्चा घडवून आणली यानंतर शेतक-यांनी हे आंदोलन मागे घेतले.परंतू येत्या चार दिवसात हा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी आपली जळालेली पिके घेऊन येत्या चार तारखेला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा ईशारा यावेळी शेतक-यांनी दिला आहे यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, देविदास हुशार स्वाभिमानी शेतकरी संघटंनेचे बाळासाहेब फटांगडे, दत्तात्रय फुंदे, अशोक दारकुंडे,सिराज काझी, दिलीप काळे, सोमनाथ आधाट,अमोल देवढे, विकास आधाट, ज्ञानेश्वर देवढे, निवृत्ती आधाट,अंबादास काळे, गणेश नाबदे,नितीन देवढे, श्रीराम देवढे,वैभव घनवट,निलेश डमाळ, विठ्ठल देवढे, ज्ञानेश्वर डमाळ, नितीन घुगे,गोरख कौसे, राजेंद्र शहाणे, महादेव लंगोटे , मनोज रोडगे, संतोष घुगे यांच्यासह सुमारे शंभर ते दिडशे शेतकरी उपस्थित होते.