महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विजय वसेकर कृषी क्षेत्रातील कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विजय वसेकर कृषी क्षेत्रातील कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विजय वसेकर कृषी क्षेत्रातील कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित .

        ह्युमन सर्व्हिसेस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी क्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषी विस्तार, कृषी संशोधन बरोबर सामाजिक ग्रामविकास इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथे कृषी पदवीचे व सध्या पदवीत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कृषी पदवित्तर शिक्षण घेत असतलेला विद्यार्थी विजय दत्तात्रय वसेकर यास कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मान करण्यात आला विजय वसेकर याने.

              द्राक्ष निर्यातीचा फायदा थेट उत्पादकालाच या विषयाची भूमिका घेत निर्यातप्रतीची द्राक्षे उत्पादित करण्यासाठी मार्गदर्शन करणे, फळबाग छाटणी मार्गदर्शन, मोफत पाणी व माती परीक्षण, शाश्वत शेती व निर्यातीचा मंत्र ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत या प्रकारची अनेक कामे त्यांनी केली या साठी विजय वसेकर यास रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज चे प्राचार्य आर.जी.नलावडे सर तसेच पदवीत्तर महाविद्याल राहुरी कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ डी.के.कांबळे सर तसेच सह प्राध्यापक डॉ.यु.एस.गायकवाड, डॉ.एस.डी मंडकमाले, डॉ डि.के.देवकर डॉ एम.जी.मोटे व इतर प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व या निवडीबद्दल अभिनंदनही केले. मा.आमदार रोहित दादा पवार व मा.आमदार सुधीरजी तांबे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आला.