जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत किड्स किंग्डम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत किड्स किंग्डम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

दिल्ली 91 बृतांत

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत किड्स किंग्डम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

सोन‌ई /वार्ताहर / सन 2022/23 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सोनई येथील किड्स किंग्डम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे जवाहर नवोदय विद्यालय समिती तर्फे घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेत किड्स किंग्डम अकॅडमी सोनई चा विद्यार्थी ओम राजेंद्र धनवडे यांची निवड झाली आहे दरवर्षी या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात परंतु निवडीचे प्रमाण अत्यंत अल्प असल्यामुळे किड्स किंग्डम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने सोनई आणि परिसरात या विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये निवड झाल्याबद्दल ओम राजेंद्र धनवडे या विद्यार्थ्याचे किड्स किंग्डम विद्यालय संस्थेचे सचिव सचिन बंग मुख्याध्यापिका कीर्ती तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांच्यातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले या परीक्षेसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन शाळेतील स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख फटाले सर मुख्याध्यापिका कीर्ती बंग यांनी केले निवड झालेल्या ओम धनवडे याचे पुढील शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय स्वायत्त संस्था शिक्षा मंत्रालय भारत स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे होणार असल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले सोनई येथील किड्स किंग्डम विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धेत यश मिळवत असल्याने सर्वत्र विद्यालयाचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे