नेवासा तालुक्यातील कौठा येथील कै.सुमनबाई चंद्रचूड काळे जाण्याने कुटुंबातील आधारवड हरपला.

नेवासा तालुक्यातील कौठा येथील कै.सुमनबाई चंद्रचूड काळे जाण्याने कुटुंबातील आधारवड हरपला.

        नेवासा तालुक्यातील आदर्श गाव कौठा या गावात कै. चंद्रचूड काळे यांचे कुटुंब अगदी पुरोगामी विचाराचे व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे व अगदी सर्व क्षेत्रात अग्रेसर.

        काही वर्षांपूर्वी याच कुटुंबातील गावचे मार्गदर्शक चंद्रचूड काळे पाटील जाण्याने कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु कै. सुमनबाई ह्या अतिशय कौटुंबिक , जिद्दी व जिज्ञासू आई होत्या . त्या खचून न जाता कुटुंबामागे उभे राहून प्रपंच पुन्हाआनंदाने फुलवला. अतिशय धार्मिक वृत्तीच्या असणार व्यक्तिमत्त्व.

      काल पुन्हा या काळे कुटुंबावर काळाने घाला घातला व अथांग रुपी सागरा एवढ्या प्रेम करणाऱ्या कै. सुमनबाई चंद्रचूड काळे ह्या अनंतात विलीन झाल्या. त्यानी काल सायंकाळी सहा वाजता राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कौठा , देडगाव शहापूर ,देवगाव परिसरामध्ये शोक व हळहळ व्यक्त होत आहे.

*आ*- आत्मा

*ई* - ईश्वर 

*सु* - सुंदर जिवन जगता ,जगता दुसऱ्यासाठी जगून पहिलं

*म*- महान कार्य करुन दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.

*न*. - नकारार्थी विचार न करता सदा सकारात्मक विचार करणारी आई.

*बा* - बहादुर व प्रपंचात जिद्दीने राहणारी व्यक्ती.

*ई* - इश्र्वराप्रती कायम मनात भाव असणारी अनमोल व्यक्ती. 

    त्यांच्या पश्चात मोठा मुलगा अमृत चंद्रचूड काळे (मुलगा )रावसाहेब चंद्रचूड काळे (मुलगा) ऋषिकेश लक्ष्मण काळे( पुतण्या )सौ .शोभा एकनाथ अंबाडे (मुलगी )सौ. कल्पना सुभाष कर्डिले (मुलगी) व सुना नातवंड असा मोठा परिवार आहे. 

कै. सुमनबाई चंद्रचूड काळे यांचा *दशक्रिया विधी 3/3/2022 रोजी प्रवरासंगम या तिर्थावर होइल*