संगमनेर खुर्द येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,3,26,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त,11 जुगारी ताब्यात .

संगमनेर खुर्द येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,3,26,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त,11 जुगारी ताब्यात .

संगमनेर खुर्द येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 3,26,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 11 जुगारी ताब्यात.

   जुना संगमनेर पुणे रोडवर, संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीवरील पुलाचे पुढे, एका घराच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दतात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने, आकाश काळे व शिवाजी ढाकणे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन त्या ठिकाणी दाखल झाले .


         पथकास लागलीच मिळालेल्या माहिती प्रमाणे काही इसम एका खोलीत गोलाकार बसुन हातामध्ये पत्ते घेवुन पैशावर हारजीतीचा तिरट जुगार खेळताना दिसले. 

           पथकाची खात्री होताच अचानक जुगार खेळणारांवर छापा टाकला .पोलिसांनी आपली ओळख सांगून बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले . जुगार खेळणारांनी त्यांची नावं

 1) शुभम गोपाल शाहु, रा. साईनगर, ता. संगमनेर, 2) प्रशांत एकनाथ जोरवेकर, रा. जोर्वेरोड, ता. संगमनेर, 3) राजेंद्र मल्लु गायकवाड, रा. शिवाजी नगर, ता. संगमनेर, 4) वसंत दुर्गा शिंदे, रा. रायतेवाडी फाटा, ता. संगमनेर, 5) दशरथ शिवराम भुजबळ, रा. जय जवान चौक, ता. संगमनेर, 6) बाळासाहेब भिमा मांडे, 7) नवनाथ कारभारी पानसरे दोन्ही रा. जाखोरी, ता. संगमनेर, 8) जुबेर नवाब शेख, रा. फातीमा सोसायटी, ता. श्रीरामपूर, 9) दिनेश शाम जाधव, रा. अकोले नाका, ता. संगमनेर, 10) अनिल एकनाथ राक्षे ,रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर असे सांगितले.

 

       ताब्यातील इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 3,26,400/- रुपये किंमतीची रोख रक्कम, विविध प्रकारच्या 5 मोटार सायकल, 8 मोबाईल फोन व जुगाराची साधने असा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुध्द संगमनेर शहर पो.स्टे.गु.र.नं. 833/23 मजुकाक 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही संगमनेर शहर पोलिस स्टेशन करीत आहे.

 

      सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. . स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व सोमनाथ वाघचौरे , उविपोअ, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.