देडगाव येथे नांजीबाबा लहानु कोकरे यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कळस उभारणी कार्यक्रम महंत सुनीलगिरी महाराजांच्या हस्ते संपन्न.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कोकरे वस्ती येथील कोकरे कुटुंबीयाचे श्रद्धास्थान वैकुंठ वाशी नांजीबाबा लहानू कोकरे यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर उभारणीचा कळस नेवासा तालुक्याचे वैभव महंत सुनील गिरीजी महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

  या मूर्तीची व कळसाची गावभर मिरवणूक झाली. मिरवणुकीमध्ये फटाक्यांची आतषबाजी होती . व धनगर समाजाचा जूना पुराणिक खेळ गजढोल व गजनृत्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महंत सुनील गिरी महाराज यांचे कोकरे परीवार व ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. नंतर वेदमंत्रांच्या साह्याने मोठा होम हवन करून देव देवतांच्या ब्राह्मणांच्या साक्षीने व महंत सुनील गिरी महाराज यांच्या हस्ते कळसाची विधिवत पूजा करत त्या मंदिराची कळस उभारणी केली. यावेळी ह भ प गुंड महाराज श्री क्षेत्र सुकळी या नामांकित महाराजाचे कीर्तन झाले. यावेळी महंत सुनील गिरी महाराज यांनी बोलतांना सांगितले की, धनगर हा अतिशय धार्मिक समाज आहे व आपण मंदीर बांधून पावित्र्य जपावे , म्हणत देडगाव या ठिकाणी सर्व जाती धर्माचे मंदीर आहे .हे पाहून आनंद वाटतो या शब्दात अभिनंदन करत या कार्यास शुभेच्छा दिल्या नंतर या ठिकाणी ह भ प गुंड महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा भाविकांनी आनंद घेतला.

     या कार्यक्रमास ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, पोपट देवा कोकरे ,बाळ देवा तांदळे ,ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक बाजीराव पाटील मुंगसे ,माजी चेअरमन लक्ष्मण राव बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सी एडके, कुंडलिक दादा कदम, माजी सरपंच हरिभाऊ कोकरे, गणपत तात्या कोकारे, बारकु कोकरे, बन्सी कुटे, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, युवा नेते निलेश कोकरे,चांगदेव तांबे, सोसायटी नूतन संचालक रामा गोयकर, महादेव मुंगसे ,बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, बहादुर कोकरे, रामा कोकरे, राजू कोकरे सर ,दत्ता पाटील मुंगसे, पत्रकार युनूस पठाण व समस्त भजनी मंडळ व मोठ्या संख्येने महीला भगिनी व देडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनीधी युनूस पठाण