*कलंबर(बु.) येथे श्री महावीर भगवान यांची जयंती उत्साहात साजरी.*
बी.पी.एस.राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नांदेड
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
कलंबर (बु.)(ता.लोहा). कलंबर( बु.) येथे अहिंसेचे संदेश देणारे 24 वे तीर्थंकर महावीर भगवान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भगवान महावीर यांचे पाच तत्वे आहेत अहिंसा- सत्य -अस्तेय -व्याभिचार आणि अपरिग्रह. भगवान महावीर यांनी अहिंसेवर जास्त भर दिला. जीव हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये असे संदेश जनजनात पोहोचून सांगितले. या प्रतिज्ञेच्या पलीकडे त्यांनी आचरण, विश्वास आणि ज्ञान त्याच्यावर जास्त भर दिला. त्यांनी सांगितले की दुसऱ्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास घ्या, दुसऱ्याला दुखी करू नका, प्राणीमात्रांवर दया करा असे संदेश दिले. त्यांनी "जिओ और जिने दो" हा महत्वपूर्ण संदेश दिला.
यावेळी जयंती साजरी करताना गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री मनुसिंग ठाकूर, श्री भैयालाल मंडले, श्री प्रवीण कच्छवा, श्री दिलीप भोपाळे, श्री श्रीधर गोरे, श्री बळीराम पाटील भोकरे, श्री पिंटू तुपेकर, श्री धनंजय म्हैसकर, श्री अमोल म्हैसकर, श्री देवेंद्र म्हैसकर, श्री पवन तरटे या सर्व ग्रामस्थांनी आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत ह्या विचाराने जाती-धर्म -पंथ एकमेकाचे भेदभाव विसरून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.