*बार्शी येथे भव्य रॅली सह "भगवान महावीर" यांची जयंती उत्साहात साजरी*
बि.पि.एस. राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी.(ता.बार्शी) आज दि.14-04-2022 वार-गुरूवार. संपूर्ण देशाला अहिंसाचे, शांततेचे संदेश देणारे जैन धर्माचे शाशनपती 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती बार्शी येथे अतिशय उत्साहात, आनंदात साजरी करण्यात आली.
भगवान महावीर यांचे मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे होय. भगवान महावीर यांची पाच प्रतिज्ञा होती अहिंसा,- सत्य, -अस्तेय, -व्याभिचार आणि अपरिग्रह. त्यांनी सांगितले की दुःख आणि सुख या दोन्ही बरोबर समांतर व्यवहार केला पाहिजे. भगवान महावीर हे वीर, अतिविर, सन्मती आणी वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकर आहेत. त्यांनी पूर्व वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या अध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणीचा विस्तार केला. भगवान महावीर यांनी स्वतः दुःख घेऊन दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मुख्य संदेश "जिओ और जिने दो" हा आहे.
जैन धर्माचे संस्थापक पहिले तीर्थंकर श्री आदिनाथ भगवान आणि चोविसावे तीर्थंकर म्हणून ओळखले जाणारे भगवान महावीर यांनी जैन धर्माचा प्रचार करून अहिंसेचे संदेश दिले. गेल्या दोन वर्षापासून कोरोना चा काळ असल्याकारणामुळे जयंती काढण्यात आलेली नव्हती मात्र यावर्षी शासनाने पूर्णपणे नियम हटविल्या मुळे महावीर जयंती अति उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली. ही जयंती साजरी करताना जैन धर्मातील दिगंबर, श्वेतांबर आणि स्थानकवासी या तीनही पंथांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एकत्र येऊन मिरवणूक काढली व जयंती साजरी केली. यामध्ये महिलांनी सुद्धा खूप मोठा सहभाग घेतला.
या रॅलीच्या दरम्यान ठीकठिकाणी पेयजल, शरबत सर्वांसाठी ठेवण्यात आले. यावेळी या रॅलीमध्ये बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत याांनी येऊन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व हातामध्ये जैन पताका घेऊन आनंद व्यक्त केला. तसेच प्रतिष्ठित नागरिक सुभाष लोढा, धन्यकुमार शहा, प्रदीपकुमार बागमार, भरतकुमार परमार, प्रविण मांडवकर, अनिरुद्ध अन्नदाते, शिवाजी अन्नदाते, त्रिलोकचंद तरटे, सुजित काळेगोरे, हेमंत पलसे, राहुल बुबने, सागर अन्नदाते, चैतन्य, परिमल, विराज, राजेंद्र धारूरकर, सम्मेद तरटे आदी उपस्थित होते