*बकरी ईद सणाला गाईची कुर्बानी नको : बद्रुद्दिन अजमल*
बी पी एस राष्ट्रीय न्यूज सोलापूर.
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
गुवाहाटी: राज्यातील धार्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक कायम ठेवण्यासाठी बकरी ईद सणाच्या दिवशी गायीची कुर्बानी देता कामा नये, असे आवाहन राज्यातील 'जमियत उलेमा" या संघटनेच्या स्थानिक शाखेने केले आहे. या सणा दिवशी कुर्बानी ही महत्त्वाची असते पण, हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी गायीच्या ऐवजी इतर प्राण्यांचा बळी देण्यात यावा अशा प्रकारचे वक्तव्य या संघटनेचे प्रमुख "बद्रुद्दीन अजमल" यांनी सांगितले. सनातन धर्माच्या मते या गाईला मातेचा दर्जा दिला जात असून तिचे पूजन ही करण्यात येते. आपण हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेस पोहोचता कामा नये, असेही या संघटनेने म्हटले आहे.