शेवगाव अर्बन बँकेच्या शाखेचा त्या बनावट सोनेतारण प्रकरणी 250 पानांचे दोषारोपपत्र दाखल
बँकेच्या शेवगाव शाखेचा गोल्ड व्हॅल्यू अरसह 159 अर्जदारांचा आरोपित सामावेश
अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोल्ड व्हॅल्यू अर.विशाल गणेश दहिवळकर.(रा. शेवगाव) यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेवगाव न्यायालयात250पाणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
कर्जदाराकडून बनावट सोने घेऊन ते खरे असल्याचे भासवत त्यांना मूल्यांकन दाखले देऊन बँकेची फसवणूक केल्याचा दोष आरोपी दहिवळकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
उगाव शाखेतील बनावट सोनेतारण प्रकरणी गोल्ड व्हेल्र्युअर दहिवळकर सह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत शेवगाव शाखेचे व्यवस्थापक आणि वासू मल अहुजा यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सन2017 ते 2021 या कालावधीत गोल्ड व्हॅलीअर दहिवळकर व कर्जदारांनी संगणमत करून बनावट दागिने खरे असल्याचे भासवून मूल्यांकन दाखले देऊन बँकेकडून कर्ज घेतले कर्जदारांना वेळोवेळी नोटिसा दऊनही त्यांनी तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या सोन्याचा निलाव ठेवण्यात आला होता मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे समोर आले होते.
मागील चार वर्षाच्या कालावधीत 159 कर्जदारांनी 364 पिशव्यात 27 किलो 351 ग्राम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे 5 कोटी 30 लाख 13 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यामुळे बँकेचे गोल्ड व्हेल्र्युअर दहिवळकर यांच्यासह 159 कर्जदारांवर बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी दहिवळकर यांना अटक केली होती. यांच्या विषयी पुरावे गोळा करुन अडीचशे पानाचे दोषारोप पत्र तयार करण्यात आले.