शिक्षणाचे बीजे खोलवर रुजवले असून त्यामुळे सावित्रीबाईची श्री शिक्षणासाठीचे स्वप्न साकार होताना दिसत आहे

शिक्षणाचे बीजे खोलवर रुजवले असून त्यामुळे सावित्रीबाईची श्री शिक्षणासाठीचे स्वप्न साकार होताना दिसत आहे

कोरडगाव. रमेश जोशी श्री शिक्षणाचे बीजे खोलवर रुजवली असून विविध क्षेत्रांमध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यामुळे सावित्रीबाई चे स्त्री शिक्षणासाठीचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी सुलोचना पठारे यांनी नेवासा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री राजेंद्र जोशी यांच्या सेवापुर्ती सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जी नवले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुने. पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळ भाऊ दौंड. उपसभापती किशोर झुंजार .शिक्षण नेते रावसाहेब रोखले .शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र मुंगसे. माजी. संचालक कल्याण राव शिंदे. पाथर्डी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र मस्के. राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस अनिल बंड. कवी अर्जुन देशमुख. सेलचे तालुकाप्रमुख अशोक गोरे .वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण काकडे. भा.ज.पा .कार्यालयीन प्रमुख दादासाहेब येढे. निजाम भाई पटेल आदी उपस्थित होते. यावेळी पठारे पुढे बोलताना म्हणाले की पूर्वीच्या काळी स्त्रीची मजल चूल आणि मूल इतकीच होती. परंतु सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले त्यामुळे आज विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रपती पदापासून ते संरक्षण क्षेत्रा मध्ये सुद्धा महिलांनी आपले योगदान सिद्ध केले आहे. कौटुंबिक जबाबदारी पाहून महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने सावित्रीबाई चे स्वप्न साकार होताना दिसत आहे .ही बाब कौतुकास्पद आहे .अशी यावेळी बोलताना त्या म्हणाल्या यावेळी नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुने बोलताना म्हणाले की शिक्षणामुळे स्त्री बरोबरच कुटुंब साक्षर होण्यास मदत होते. त्यामुळे स्त्री सुशिक्षित असेल तर कुटुंबावर संस्कार चांगले होतात असे यावेळी बोलताना ते म्हणाले पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळ भाऊ दौंड बोलताना म्हणाले . स्त्री यांनी आपल्या पायावर स्वयंभू उभे राहून आपले वर्चस्व सिद्ध करून विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवले असून त्यांना कुटुंबा मधून ही तेवढेच पाठबळ मिळत असल्यामुळे स्त्रीया आता स्वयंपूर्ण होतांना दिसत आहेत. हा भारतीय संस्कृतीचा ठेवा स्त्री यांनी आत्मसात करून आपले स्थान निर्माण करावे असे यावेळी बोलताना ते म्हणाले .यावेळी ग्रामीण साहित्यिक कैलास दौंड यांनी स्त्रियची जबाबदारी व त्यांना नोकरी व कुकुटुं सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. या गोष्टीकडे गांभीर्याने बघून त्यांच्या आरोग्यासाठी कुटुंबाने सुद्धा त्यांना त्यांच्या कामात प्रस्थान देऊन सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांना यावेळी बोलताना केली या कार्यक्रमास नेवासा तालुक्यातील शिक्षण रुंद व सतीश जोशी .रवींद्र जोशी .ऍड नंदकुमार जोशी. पत्रकार रमेश जोशी. किरण चंद्रात्रे .श्रीकांत जोशी. शेखर देशमुख. किशोर देशमुख. राजेंद्र जोशी. योगेश जोशी आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर तुषार जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रेवणथ पवार यांनी केले. व आभार राजेंद्र जोशी यांनी मानले.