राज्यातील विभागीय, जिल्हा क्रीडा संकुलासाठी अनुदानाची मर्यादा वाढविली !

राज्यातील विभागीय, जिल्हा क्रीडा संकुलासाठी अनुदानाची मर्यादा वाढविली !

राज्यातील विभागीय, जिल्हा क्रीडा संकुलासाठी अनुदानाची मर्यादा वाढविली !

प्रतिनिधि:वाहिदशेख(ब्यरो रिपोर्ट्स)

https://bpslivenews.in

मुंबई, दि. 20 - राज्यातील क्रीडा सुविधा वाढविण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल तसेच तालुका क्रीडा संकुलांसाठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार ही उपस्थित होते .

सध्या विभागीय क्रीडा संकुलांसाठी आर्थिक मर्यादा 24 कोटी असून ती वाढवून 50 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलांसाठी 8 कोटी रुपये आर्थिक मर्यादा असून ती वाढवून 25 कोटी रुपये आणि तालुका क्रीडा संकुलांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मर्यादा असून ती वाढवून 5 कोटी रुपये या प्रमाणे वाढविण्यास मान्यता दिली.

हे वाढीव अनुदान प्रशासकीय मान्यता दिलेल्या पण अद्याप बांधकाम सुरु न झालेल्या तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलांना मिळेल.