अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी व दंड '

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी व दंड '

 अहमदनगर : आरोपी नामे आकाश बबन शिरसाठ , वय - २० वर्षे , रा . प्रसादनगर , राहुरी फॅक्टरी , ता . राहुरी जि . अहमदनगर , याने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अहमदनगर येथील में . जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र . २ श्रीमती एम.ए. बरालिया यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ४ तसेच भा.द.वि. कलम ३७६ ( २ ) ( एन ) नुसार दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच रक्कम रूपये २०,००० / - हजार रूपये व दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक ०१.०७.२०१५ रोजी पिडीत मुलीची आई फिर्यादी हिने राहुरी पोलिस स्टेशनला गु.र.नं. २५२/२०१५ भा.द.वि. कलम ३६३,३६६ नुसार तिची मुलगी पिडीत हिस आरोपी आकाश बबन शिरसाठ याने लग्नाचे आमिष दाखवुन फुस लावून पळून नेलेबाबतची फिर्याद दाखल केलेली होती . सदर घटनेचा तपास पी . एस . आय . सी . आर . गावंडे यांचेकडे दिल्यानंतर सदर पिडीत मुलगी ही दिनांक ३१.०७.२०१५ रोजी इंदापुर येथे आरोपी सोबत मिळून आली . पिडीत मुलगी मिळाल्यानंतर तिचा जबाब राहुरी पोलिसांनी नोंदविला . त्यावेळी तिने सांगितले की , आरोपी आकाश बबन शिरसाठ याचे लग्न झालेले असून तो तिला म्हणायचा की , मला माझी बायको आवडत नाही मला तुझे सोबत लग्न करावयाचे आहे . आपण पळुन जावू . त्यावेळी पिडीत मुलगी आरोपीला म्हणाली की , माझे वय १८ वर्षे पेक्षा कमी आहे . असे असताना देखील दिनांक २६.०६.२०१५ रोजी आरोपी हा पिडीत मुलीला घेवून श्रीरामपुर रेल्वेस्टेशनला गेला . श्रीरामपुर येथून आरोपीने पिडीत मुलीस रेल्वेने दौंण्ड मार्गे तिरुपती बालाजी येथे देव दर्शनासाठी घेवून गेला . दर्शन घेतल्यानंतर आरोपीने पिडीत मुलीस इंदापुर येथे एक खोली भाडयाने घेवून ठेवले . तेथे राहत असताना आरोपी हा पिडीत मुलीशी बळजबरीने शारिरीक संबंध करत होता . सदर पिडीत मुलीचा जबाबा नोंदविल्यानंतर राहुरी पोलिसांनी गुन्हयामध्ये आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३७६ व पोक्सो कायदा कलम ४ इत्यादी वाढीव कलम लावले .

सदर गुन्हयाचा तपास पी . एस . आय . सी . आर . गावंडे यांनी पूर्ण करून मा . न्यायालयामध्ये आरोपी विरुद्ध दोषारोपत्र दाखल केले . सदरचा खटला सुरूवातीला मा . जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.व्ही . देशपांडे यांचे न्यायालयात चालला . तेथे सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये फिर्यादी , अल्पवयीन पिडीत मुलीची साक्ष , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वैद्यकिय अधिकारी तसेच वयासंदर्भात नगर परिषद राहुरी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर सदर खटल्याचे शेवटचे कामकाज तसेच युक्तीवाद मा . जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र . २ श्रीमती एम.ए. बलिया मॅडम यांचे न्यायालयात पूर्ण झाले . सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपी नामे आकाश बबन शिरसाठ यास मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी पोहेकॉ . डहारे , के . एन . पारखे , पो.हे. कॉ . संजय आर . पठारे , पो.कॉ. रमेश शिंदे यांनी सहकार्य केले ..

 अहमदनगर ता . २६ / ० ९ / २०२२

 ( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )

 विशेष सरकारी वकील , अहमदनगर . 

मो . ९ ८५०८६०४११,

८२०८ ९९ ६७ ९ ५