*अहिल्यानगर MIDC मध्ये भीषण आग; ग्लोबल ट्रेडिंग कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसान*
*अहिल्यानगर MIDC मध्ये भीषण आग; ग्लोबल ट्रेडिंग कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसान*

*अहिल्यानगर, दि. 17 मे 2026*: शहरातील एमआयडीसी परिसरात आज दुपारच्या सुमारास ग्लोबल ट्रेडिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप इतके मोठे होते की काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने व्यापून गेला आणि आकाशात दूरवर काळ्या धुराचे मोठमोठे लोट दिसून येत होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आगीमुळे कंपनीतील साहित्य, यंत्रसामग्री व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किट किंवा रासायनिक पदार्थांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.








