महा पावन गणपती परिसरात बालाजी फाउंडेशनच्या वतीने महाश्रमदाना सोहळ्यानिमित्त वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे :- पद्मश्री पोपटराव पवार

महा पावन गणपती परिसरात बालाजी फाउंडेशनच्या वतीने महाश्रमदाना सोहळ्यानिमित्त वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे :- पद्मश्री पोपटराव पवार

देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण) आज दि.१० रोजी नेवासा तालुक्यातील देडगाव ,माका, पाचुंदा ,म.ल.हिवरा या चार गावाच्या सीमेवर असणारे महापावन गणपती देवस्थान येथे सुरू असलेल्या बालाजी फाउंडेशनच्या वतीने महा श्रमदान आयोजित सप्ताह निमित्त पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते विविध १०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

         वृक्षारोपण नंतर पद्मश्री पोपटराव पवार व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महा पावन गणपतीची विधीवत पूजा करण्यात आली.

        पद्मश्री पोपटराव पवार व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्यानंतर पावन गणपती मंदिराच्या सभागृहामध्ये मार्गदर्शन पर सभा पार पडली .सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर शिवाजीराव पठाडे यांनी केले. प्रास्ताविकात आतापर्यंत झालेल्या कामाबद्दल व भविष्यात होणाऱ्या कामाबद्दल माहिती देत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित या परिसरावाचे नंदनवन करू. व या ठिकाणी १००० जागतिक पंचवृक्ष लावण्याचा प्रयत्न आहे.हे तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून करण्याचा माझा मानस राहील .तरी मला परिसरातून सर्वांनी सहकार्य करावे .अशी मी सर्वांना विनंती करतो.

          यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांचा सन्मान बालाजी फाउंडेशन, महा पावन गणपती देवस्थान ,ग्रामपंचायत माका,ग्रामपंचायत म.ल. हिवरा ,ग्रामपंचायत पाचुंदा , ग्रामपंचायत देडगाव, तेलकुडगाव विविध कार्यकारी सोसायटी, एकलव्य संघटना , संत रोहिदास देवस्थान अशा विविध संघटनेच्या ,शाखेच्या वतीने भव्य नागरी सन्मान करण्यात आला.

            यावेळी माजी सभापती भगवानराव गंगावणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब शेळके,शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, माका गावचे सरपंच अनिल घुले ,देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, देवस्थानचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे,विश्वस्त अशोकराव मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

         यावेळी पद्मश्री पोपटराव बोलताना म्हणाले की संत महंतांनी सुद्धा शेकडो वर्षांपूर्वी वृक्षांची महती सांगितली होती. व आपणही या पुढील काळात वृक्षाचे जतन प्रत्येकाने करावे .सर्वांनी आपापली मतभेद विसरून या परिसरातील विकासासाठी एकत्र येऊन मोठ्या मनाने या महा श्रमदानामध्ये भाग घ्यावा. व या पुढील काळामध्ये पर्यटन स्थळ होण्यासाठी सर्वांनी विशेष परिश्रम घ्यावे. यामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा ही आज काळाची गरज आहे .या देवस्थानच्या व परिसराच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहील व नेत्यांकडे शब्द खर्चून निश्चित विकासाला योगदान देण्याचा प्रयत्न करेन.अशा अनेक विषयावर आपले मनोगत व्यक्त करत संबोधित केले.

           या महा श्रमदान सोहळ्याला दीपकराव काजळे, सुभेदार राजू खांडगे , माजी सभापती कारभारी चेडे , ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, सुनील मुथा,संदीप गुंजाळ, राजू ठाणगे, चेअरमन काकासाहेब काळे, महेशराजे काळे ,माका गावचे चेअरमन मल्हारी आखाडे, चाईल्ड करिअर स्कूलचे संस्थापक सागर बनसोडे सर,दत्ता मुंगसे ,संभाजी काजळे ,अभिजीत ससाणे, शिवाजीराव मुंगसे, महेश चेडे, बालाजी फाउंडेशनचे सचिव शिवाजीराव उबाळे, गहिनीनाथ पठाडे, महादेव मुंगसे ,अशोक मुंगसे, बन्सी वाढेकर , संजय मुंगसे, तसेच माका, पाचुंदा ,देडगाव मलहिवरा या परिसरातील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

          तर या श्रमदान सोहळ्यासाठी बालाजी फाउंडेशन चे अध्यक्ष शिवाजीराव पठाडे , गणेशराव औटी, माजी विद्यार्थी संघ २००१ बॅच व महा पावन गणपतीचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे ,भाऊसाहेब मुंगसे ,बन्सी मुंगसे ,आदिनाथ कुटे, नवनाथ रक्ताटे, देविदास रक्ताटे, लक्ष्मण मुंगसे सर,यांनी विशेष सहकार्य करत परिश्रम घेतले.

           या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य मुरलीधर दहातोंडे यांनी केले.