गावरान कांदा विक्रीसाठी अंतिम टप्प्यात आवक घटल्याने दरवाढ शेतकरी सुखावला.
गावरान कांदा विक्रीसाठी अंतिम टप्प्यात आवक घटल्याने दरवाढ शेतकरी सुखावला.
खेडले परमानंद/वार्ताहर //दि 19. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर कोसळले होते त्यातच केंद्र सरकारकडून निर्यात शुल्क 40% ने वाढल्याने कांद्याचे दर अजून खाली येतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या विरोधात विविध संघटना व पक्ष आंदोलन करू लागल्या होते याचा विचार करून सरकारच्या वतीने नाफेड मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र नाफेडच्या किचकट अटी शर्थी मुळे किंवा अन्य कारणामुळे शेतकरी तिकडे फिरकेना साठवणूक करून ठेवलेला गावरान कांदा बाजारात विक्रीसाठी आता अंतिम टप्प्यात आला असून नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार घोडेगाव येथे सोमवार दि 18 रोजी झालेल्या लिलावात गावरान कांद्याला पहिल्यांदाच 2200 ते 2222 रुपयाचा भाव मिळाला दरम्यान उच्च प्रतीच्या एका क्विंटल कांद्याला 2700 रुपये क्विंटल पर्यंत दर गेला कांद्याचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे असे असले तरी साधारण बाजारामध्ये आवक घातल्याने दोन महिन्यापूर्वी शेतकऱ्याला याचा फायदा झाला नाही केंद्र सरकारच्या नाफेड खरेदीच्या घोळामुळे शेतकऱ्यांना पूर्वी मातीमोल भावाने कांदा विकावा लागला घोडेगाव उपबाजार आवारात सोमवारी 325 वाहनातून जवळपास 56 हजार 700 गोण्याची आवक झाली मुकल लालपती , गोलटी या कांद्याला 1000 आणि 1500 ते 2200 रुपये दर निघाले साठवणूक करून ठेवलेला कांदा शेतकरी व साठवणूकदार यांनी विक्रीसाठी आणला आहे.
कांद्याची मागणी हळूहळू वाढत आहे तसे कांद्याचे दरही वाढत असल्याचे कांदा व्यापाऱ्याचे म्हणणे आहे साठवणूक करून ठेवलेला कांदा आता संपत आला असून पाऊस नसल्याने कांदा लागवडीवर याचा परिणाम दिसून येत आहे .
आवक घटल्याने आणखी दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा चांगलाच वांदा करणार असे दिसते