नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे राजबक्षवली यात्रा उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ.

प्रतिनिधी खेडले परमानद // नेवासा
खेडले परमानंद येथे उद्यापासून राज बक्षवली उरूस सुरू .
खेडले परमानंद येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी राजबक्षवली उरुसाचे आयोजन करण्यात आलेले
असून
सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी कावड व संदल ,
मंगळवार .दिनांक २ एप्रिल रोजी छबिना तर बुधवार दिनांक ३ रोजी हजऱ्या व हंगामा असा त्रिदनात्मक उरुसा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .
पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला खेडले परमानंद येथील हंगामा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.राज्यभरातून मल्ल या उरुसानिमित्त हंगाम्या साठी येत असतात .तरी संबंधित उरूसाची पंचक्रोशीतील व्यापारी व कुस्तीप्रेमी मल्लांनी नोंद घ्यावी.
यावर्षी यात्रा उत्सवाचे विशेष म्हणजे गुढीपाडवा रमजान ईद व यात्रा बरोबर असल्यामुळे यात्रेला मोठे व्यापक स्वरूप लाभले आहे.शहरात नोकरी व्यवसाय करता बाहेर गावी राहत असलेले ग्रामस्थ मंडळी मोठ्या उत्साहाने यात्रा उत्साहात सहभागी होण्यासाठी गावामध्ये दाखल झालेले आहेत.