छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणाचा तपास CID कडे देण्याची मराठा समाजाची मागणी .

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणाचा तपास CID कडे देण्याची मराठा समाजाची मागणी .

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणाचा तपास CID कडे देण्याची मराठा समजाची मागणी.

 

     आरोपींचा तपास न लागल्यास दि.१ एप्रिला राहुरी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन  

 

 

 

           राहुरी येथे बुधवार दि.२६ मार्च रोजी शहरातील बुवासिंद बाबा तालीम येथे अज्ञात समाज कंटकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला काळे फासून विटंबना केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्र होवून मोठ्या प्रमाणवर तणाव निर्माण झाला होता.याच विषयावरून राहुरी येथे अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कुलबरमे यांना मराठा समजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

 

            यावेळी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केल्यामुळे छत्रपती शिवशंभू प्रेमींच्या भावना तीव्र आहेत.पोलिस प्रशासन अद्याप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाज कंटकापर्यंत पोहचू शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाज कंटकाला तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्या समाज कंटकांची नावे जाहीर करण्यात यावी.सदरील घटनेचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (CID) यांच्याकडे देण्यात यावा. दि.३१ मार्च २०२५ पर्यंत वरील मागण्या मान्य न झाल्यास मराठा एकीकरण समिती,सकल मराठा समाज,मराठा क्रांती मार्चा राहुरी तालुका यांच्या वतीने सर्व छत्रपती शिवशंभू प्रेमींना सोबत घेवून मंगळवार दि.१ एप्रिल २०२५ रोजी राहुरी पोलिस ठाण्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा श्री.देवेंद्र लांबे यांनी दिला आहे., व होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी हि सबंधित प्रशासनाची असेल असे सांगण्यात आले आहे.

 

          या प्रसंगी राजूभाऊ शेटे, सचिन म्हसे,नितीन (बालूशेठ) तनपुरे, अशोक कदम,प्रवीण देशमुख, सतीश घुले, प्रवीण तनपुरे, ईश्वर गाडे ,देवेंद्र जाधव ,विजय कोकडे, कांता तनपुरे ,बापूसाहेब काळे ,सागर ताकटे आदी उपस्थित होते.