घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्रात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन.

घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्रात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन.

घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्रात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन.

खेडले परमानंद वार्ताहर // नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे समाजातील अनाथ मुलांसाठी महात्मा फुले बाल संगोपन केंद्र चालविले जाते समाजातील ज्यांचे माता पित्याचे छत्र हरपले आहे असे अनाथ मुले व मुली या बाल संगोपन केंद्रा मध्ये शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याचा प्रयत्न करतात समाजातील दानशूर व्यक्तींच्या दानावर हे संगोपन केंद्र चालविले जाते हे बाल संगोपन केंद्र नाथपंथी डवरी गोसावी समाजातील एका शिक्षीत युवकाने तसा हा समाज कायमच भटकंती करत असतो अशा या भटक्या विमुक्त समाजातील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील एका तरुण युवकाने याचा पुढाकार घेतला या बाल संगोपन केंद्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनाथ मुले शिक्षण घेतात संस्थापक-अध्यक्ष चौगुले सर त्यांची पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात कायम भटकंती करणाऱ्या समाजामधील एका युवकाने पुढाकार घेऊन या संगोपन केंद्राची उभारणी केली माता पित्याचे छत्र हरपल्याने ज्या कोवळ्या वयात वाईट नादाला लागून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळून आयुष्याचे वाटोळे करून घेतात अशा मुलांना शिक्षण देऊन समाजामध्ये ताट मानेने जगण्याचे शिक्षण या बाल संगोपन केंद्रात दिले जाते अशा या बालसंगोपन केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात गणेश विसर्जन मोठ्या उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले .