*इंद्रधनुष्य २०२६ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गोदा एकांकिकेला तृतिय पारितोषिक.*

*इंद्रधनुष्य २०२६ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गोदा एकांकिकेला तृतिय पारितोषिक.*

*इंद्रधनुष्य २०२६ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गोदा एकांकिकेला तृतीय बक्षीस*

*राहुरी विद्यापीठ, दि. 28 नोव्हेंबर, 2026* 

         यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे झालेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२६’ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या संघाने एकांकिका स्पर्धेत तृतीय बक्षीस पटकविले आहे. नाशिक येथे झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरी विद्यापीठाच्या संघाला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दि. १९ ते २३ नोव्हेंबर, २०२६ दरम्यान झालेल्या या राज्यस्तरीय महोत्सवात राज्यातील २७ विद्यापीठांचे १,१२३ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये रंगमंचीय कला गटात झालेल्या एकांकिका स्पर्धेत राहुरीच्या संघाने गोदा ही एकांकिका सादर केली.

        शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यासारखी असलेल्या गोदा नावाच्या गाईवर आधारित या एकांकिकेचे कथानक होते.

गाईवरील प्रेम, शेतकऱ्याचे दुःख आणि लंपी आजाराचे वास्तव यांचे हृदयस्पर्शी चित्रण कलावंतांनी सादर केले. गोदाच्या व्यथेतून शेतकऱ्याच्या व्यथा मांडणाऱ्या या एकांकिकेने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आणि परीक्षकांचीही दाद मिळवली. एकांकिकेमध्ये काम करणाऱ्या कलावंतांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, शिक्षण संचालक डॉ.साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ.प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या यशामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.