शिवजन्मोत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न ,शिवप्रेमींनी शिबिरामध्ये रक्तदान करून साजरी केली शिवजयंती.

शिवजन्मोत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न ,शिवप्रेमींनी शिबिरामध्ये रक्तदान करून साजरी केली शिवजयंती.

*शिवजन्मोत्सवानिमित्त शिव प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित*

            शिवजयंती निमित्त शिव प्रतिष्ठान तसेच डॉ पवार हॉस्पिटल तर्फे तसेच रोटरी ब्लड बँक राहुरी यांच्या सौजन्याने डॉ पवार हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातून आलेल्या शिवप्रेमींनी शिबिरामध्ये रक्तदान करून शिवजयंती साजरी केली. कार्यक्रमप्रसंगी राज्याचे माजी राज्यमंत्री मा.आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व शिवप्रेमींना रक्तदान करण्याचे आवाहन केले, त्यांनी शिव प्रतिष्ठान तर्फे केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

           या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे शिवाजीआप्पा डौले, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, अँड राहुलभैया शेटे, सिद्धार्थ रासने, संदीप कवाने, शिवांकुर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नारायण निमसे, अशोक झिंज आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तसेच शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके, खजिनदार डॉ किशोर पवार, विश्वस्त भास्करराव पवार, उत्तमराव पवार, डॉ नरेंद्र इंगळे, ज्योती शेळके, युवराज पवार, शिल्पा इंगळे, मंगलताई पवार आदी विश्वस्तांची उपस्थिती लाभली. तसेच शिबिराचे नियोजन संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

                 रक्तदान शिबिरासाठी मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, बालाजी क्रिकेट अकॅडमी तसेच शिवांकुर परिवारातील अनेक सदस्य सहभागी झाले होते.*बालाजी क्रिकेट अकॅडमी (बीसीए)* परिवारातील प्रमोदजी मुथा, प्रशांत सुराणा, डॉ प्रीतम चुत्तर, डॉ मयूर चुत्तर, शुभम चुत्तर, कपिल शेवाळे, दिनेश बोरा, अमितजी अग्रवाल, आनंद पारख, अक्षय पारख, डॉ प्रतीक चोहान, भाग्येश सुराणा, आशिष बाफना, डॉ महेश ईघे, डॉ प्रकाश पवार आदींनी जगातील *सर्वश्रेष्ठ दान रक्तदान* करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व आपले समाजाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. शिबिरामध्ये कांचन पानसंबळ, डॉ यश काळे, भास्कर औटी, विशाल गाडे, किरण जगधने, अशोक गाडे अविनाश तनपुरे, अथर्व तरवडे, यश पटेल, गोविंदा माहेश्वरी, संकेत भांबळ आदींनी रक्तदान केले तर तुषार तमनर, अक्षय शेवाळे, बापूराव बाचकर आदींनी नियोजनास सहकार्य केले.तसेच कार्यक्रमासाठी स्वतः आजारी असताना देखील योगेशजी राका यांनी उपस्थित राहून सर्वांचे मनोबल वाढविले.

      

               कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी तर सूत्रसंचलन डॉ किशोर पवार यांनी केले तर रोटरी ब्लड बँक राहुरी चे सर्व कर्मचारी वृंद व पदाधिकारी यांचे संस्थेचे वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आपण केलेल्या समाजसेवेसाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. माझ्या शब्दाला मान देऊन रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे प्रतिपादन डॉ प्रकाश पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना केले.