राहुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेना गटांमध्ये तीन अपक्ष उमेदवारांना शिवसेना गटामध्ये सामील करण्यात आले

राहुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेना गटांमध्ये तीन अपक्ष उमेदवारांना शिवसेना गटामध्ये सामील करण्यात आले

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरविण्यात आले आहे.

तसेच प्रभाग क्रमांक 6 अ मधून सोनाली बर्डे तर प्रभाग क्रमांक 11 अ मधून सौं.अनिता बोरुडे यांना शिवसेना पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी बाबुशेठ टायरवाले समवेल,हिराचंद पाटील तनपुरे हेअध्यक्षस्थानी होते यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे नियोजन पार पडले व नवीन तीन नगरसेवक पदासाठी असलेले उमेदवार यांना शिवसेनेत प्रवेश करून घेण्यात आले सर्वांनी त्यांच्या आभार मानले व धन्यवाद दिले

यावेळी शिवसेनेचे युवा नेते राजूभाऊ शेटे पाटील यांनी सर्व नगरसेवकांना निवडून आणण्याचे आवाहन केले