नेवासा तालुक्यातील राजकीय दहशत मोडीत काढणार-मा. ना राधाकृष्ण विखे
प्रतिनिधी :-नेवासा
भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना त्यांच्या यशस्वी ८ वर्षांची कार्यकाल पूर्ण झाल्या बद्दल बूथ सक्षमीकरण पर्व,सुशासन पर्व व गरीब कल्याणकारी पर्व पंधरवडा आयोजनाच्या निमित्ताने संघटनात्मक बैठक लक्ष्मी मंगल कार्यालय नेवासा,पावन गणपती समोर आयोजित करण्यात आली होती.
,प्रमुख मान्यवर पैकी मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील,जी.प.अध्यक्ष मा.विठ्ठल राव लंघे, राजेंद्र जी गोंदकर (भाजप जिल्हा अध्यक्ष) तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी व शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.ना.आमदार राधाकृष्ण विखे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले नेवासा तालुका हा संत ज्ञानेश्वरांची पावन भूमी आहे या भूमीमध्ये आम्ही कुठलाही जुलुम अत्याचार होऊ देणार नाही, होणारी दहशत मोडून काढणार आहोत केंद्र सरकार मार्फत ७८ विविध योजना राबविल्या जात आहेत, त्या मध्ये गरीब कल्याणकारी योजना,उज्वला गॅस,किसान सन्मान योजना,घरकुल,मोफत धान्य,इश्रम कार्ड,मोफत *लसीकरण इत्यादि.
याच वेळी बोलताना विखे यांनी महाविकास आघाडी सरकार वर देखील निशाणा साधला, राज्य सरकार धनगर आरक्षण,ओ बी सी आरक्षण, मराठा आरक्षण च्या बाबतीत अपयशी ठरले, पुढे बोलताना ते म्हणाले की राज्य सरकार नियमित कर्ज फेडणाऱ्या* शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करून अडीच वर्षे झाली परंतु प्रत्यक्षात मात्र अवलंब झाला नाही,
महाविकास आघाडी सरकार च्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे लक्तरे रोजच बघायला मिळतात, गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटून बसतात तसे हे सत्तेला चिकटून बसलेत अशी खरपूस टीका सुद्धा केली,
पक्ष सोडून इकडे तिकडे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बाबतीत विखे पाटील बोलले कि,रणांगण सोडून पळून जाणाऱ्यांची आपल्याला गरज नाही, सत्तेची दहशत नको तर जनतेचे प्रश्न सोडवा हे लोकशाही राज्य आहे असं देखील विखे पाटील बोलले
या कार्यक्रमासाठी मा.आमदार राधाकृष्ण विखे पाटील(मा.मंत्री,महाराष्ट्र राज्य),मा.श्री राजेंद्रजी गोंदकर साहेब(भाजप जिल्हा अध्यक्ष उत्तर नगर),मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे (उपाध्यक्ष -किसान मोर्चा भाजप महाराष्ट्र राज्य),मा.विठ्ठल राव लंघे पाटील(मा.जी.प.अध्यक्ष अहमदनगर), तालुकाध्यक्ष *मा.भाऊसाहेब फुलारी मा.श्री दत्तुभाऊ काळे(जी.प.सदस्य)*
*सचिन नागपुरे (नगरसेवक)Adv विश्वास काळे, प्रताप चिंधे मनोज पारखे बाळासाहेब भदगले अण्णासाहेब अंबाडे बाळासाहेब देवखिळे, अशोक टेकने प्रतीक शेजुळ काळे येडू सोनवणे देविदास साळुंखे ज्ञानेश्वर पेचे कडूबा हाडूळे विवेक ननवरे तुळशीराम काळे महेश पवार तुळशीराम झगरे तुळशीराम शिंदे कैलास दहातोंडे बाबासाहेब मोटे किरण जावळे विकास गायकवाड कुलकर्णी काका बंडूभैय्या चंदेल अरुण चांदघोडे संभाजी गडाख सुनील वाघ राजू शेख कानिफनाथ सावंत छगन माळी भसाहेब कृष्णा डहाले जालिंदर नीपुंगे रावसाहेब होन कैलास जाधव अमोल गणेश मुरदारे बाळासाहेब क्षीरसागर शरद जाधव अण्णा गव्हाणे संजय उदे सुभाष पवार गजानन गवारे गंगाधर रासने वरुडे दत्तात्रय रमेश घोरपडे अजित नरोला राजेश कडू उपदेश मोटे संदीप आदमाने सुरेश डिके सुरेश डीके आदिनाथ पटारे बाळासाहेब पिसाळ पोपट शेकडे विशाल धनगर भगीरथ पवार बाळासाहेब भदगले अण्णासाहेब आंबाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी अनेक नवीन नियुक्त्या हि करण्यात आल्या यामध्ये नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा च्या तालुकाध्यक्षपदी माननीय श्री देविदास भाऊ साळुंखे यांची निवड करण्यात आली त्याप्रसंगी माजी मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात आला व जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गोदकर मा.आ. बाळासाहेब मुरकुटे मा.ना.विठ्ठलराव लंघे भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष शरद जाधव व इतर मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.