आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत मुख्य भुमिका गाजवणाऱ्या अर्जुनची पिंप्री अवघड येथे नाना हार्डवेअरला भेट .

आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत मुख्य भुमिका गाजवणाऱ्या अर्जुनची पिंप्री अवघड येथे नाना हार्डवेअरला भेट .

आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुनची मुख्य भुमिका साकारणाऱ्या श्री . रोहित परशुराम यांनी मंगळवार दि . 25/10/2022 रोजी श्री . क्षेत्र शनिशिंगणापूर येथे सपत्नीक दर्शन घेऊन परततांना पिंप्री अवघड येथिल नाना हार्डवेअर या ठिकाणी सायंकाळी ठिक 07 वाजता भेट दिली . या ठिकाणी त्यांचा वर्गमित्र अभिजित गटकळ भेटल्याने ही भेट उपस्थितांमध्ये अविस्मरणीय ठरली आहे .

 

                 रोहित परशुराम हे पुणे जिल्ह्यातील भोर गावचे रहिवाशी आहेत . त्यांनी भोर या गावी बी फार्मसी हे शिक्षण पूर्ण केले . शिक्षणादरम्यान बाँडी बिल्डींग स्पर्धेत सहभाग घेऊन राज्य व राष्ट्रीय पातळीवर विजय मिळवत मुंबई येथे फेलकॉन श्री किताबही मिळविला आहे. मिथुन या मराठी चित्रपटातही त्यांनी आपली भूमिका साकारली आहे .

 

             शनिशिंगणापूरहून परतत असतांना पिंप्री अवघड येथे नाना हार्डवेअर या दुकानावर थांबून गावातील तरुणांची भेट घेतली व उपस्थित तरुणांना त्यांनी दिपावलीच्या शुभेच्छाही दिल्या. अर्जुनची भुमिका साकारणाऱ्या रोहित परशुरामचे पिंप्री अवघड मध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीने व तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले . यावेळी श्री . भाऊसाहेब दोंड यांच्याहस्ते रोहित परशुराम यांचा हार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित तरुणांनीही अर्जुनचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . जून्या वर्गमित्राची झालेली भेट व गावातील तरुणांनी केलेल्या स्वागताने रोहित परशुराम भारावून गेल्याचे दिसून येत होते. या कलाकाराच्या भेटीने गावातील तरुणाईही आनंदित झाली होती . गावात हनुमान मंदिरामध्ये दर शनिवारी तरुणांकडून होणाऱ्या हनुमान चालिसा पठनाचेही कौतुक अर्जून यांनी केले आहे .

 

        या कार्यक्रमावेळी नानासाहेब पवार, मुन्ना पवार, कैलास पवार, विघ्नहर्ता पतसंस्थेचे मालक अरविंद पवार, सोमनाथ लांबे, सुरेश लांबे, महेश लांबे, किरण गटकळ, महेश गटकळ, आकाश पवार, जालिंदर पवार व निलेश वाडेकर , लहानू तमनर , सुरज दोंड, चंदू लांबे सह गावातील असंख्य तरुण उपस्थित होते .