महिलेशी ओळखीचा फायदा घेऊन केला लग्नाचा बनाव, पिडित महिलेला घातला चाळीस लाखाला गंडा .
ती काळोखी रात्र आली आणि पीडितेचे आयुष्यच बरबाद करून गेली
ओळखीचा फायदा घेऊन लग्नाचा बनाव रचून पीडित महिलेला चाळीस लाखाला गंडा.
पोलिसांनी तपासात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केल्यामुळे आरोपी मोकाट.
नेवासा तालुक्यातील कुकाना येथील घटना.
विविध प्रकरणांनी गाजलेल्या नेवासा तालुक्यात महिलेवरील अत्याचार व लुबाडणूक या प्रकरणामुळे जिल्हाभर एकच खळबळ उडाली आहे .जीवे मारण्याच्या धमकी दिल्या प्रकरणी सदर महिलेने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबतचे निवेदन दिले आहे .
घटनेचा सविस्तर वृत्तांत असा आहे की नेवासा तालुक्यातील रेखा कंकर काळे वय -43 वर्षे ,राहणार जेऊर रोड , कुकाणा .यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन स्वतःवर झालेल्या आपत्तीचा व धमकीचा अर्ज दिला आहे .या अर्जात त्यांनी उल्लेख केला आहे की भारत जनार्दन शहाणे यांनी लहानपणीची जुनी ओळख दाखवून माझ्याशी फोनवर संपर्क साधला .माझा विश्वास संपादन करून माझ्या घरी येऊन माझी कुकाना येथील जागा विकण्यास प्रवृत्त केले .त्या पैशात मी तुला पुणे येथे जागा घेऊन देतो असे सांगून माझ्याकडील चाळीस लाख रुपये घेतले .
2019 मध्ये भरत शहाणे याने माझ्या घरी रात्री येऊन माझ्यावर माझ्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केला .मी तुझ्याशी लग्न करील असे खोटे आश्वासन देऊन तसेच झाल्या प्रकाराबाबत कोणाला जर काही सांगितले तर मी तुला जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली .
भारत शहाणे यांनी माझ्याशी लग्नाचा बनाव करून मला पुण्यात घेऊन गेला दरम्यानच्या काळात माझ्यावर वेळोवेळी अतिप्रसंग ,मानसिक तसेच शारीरिक छळही केला .या सर्व प्रकारा वरून माझी फसवणूक होत आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी भरत जनार्दन शहाणे राहणार आकाश नगर सुंदराबाई बिल्डिंग वारजे पुणे,सुनिता भारत शहाणे, अरुणा विष्णुपंत दहिवाळ,मीरा संजय शहाणे ,देवशाला शहाणे, मुरलीधर शहाणे, बालाजी बोकन,सुनिता शहाणे, सुरेश शहाणे यांचे विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.यांच्या विरोधात 10/05/2022 रोजी 376,420,506,498 (अ),323,506,504,34 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गुन्हा दाखल का केला म्हणून मला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .वरील सर्व व्यक्तींपासून माझ्या जीवित धोका आहे तसेच माझा घात होण्याची शक्यता आहे .या सर्व व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असून यांनी अनेक महिलांना फसविले असून यांचे मोठे रेखाटे असण्याची शंका उत्पन्न होत आहे . सदरचा आरोपी हा कोर्टात तारखेला आल्यावर माझा पाठलाग करत आहे त्यामुळे माझ्या जिवितास मोठा धोका आहे .वरील सर्व व्यक्तींची सखोल चौकशी होऊन माझ्या जिविताचे रक्षण करावे व दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचा अर्ज रेखा कंकर यांनी केला आहे .
सदर प्रकाराबाबत पोलीस विभागाने त्वरित कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी रेखा काळे यांनी BPS LIVE NEWS शी बोलताना केली आहे .