शेवगाव तालुक्यामध्ये डीजे वाजल्यास कारवाई होणार - पोलीस निरीक्षक विलास पुजारी

शेवगाव तालुक्यामध्ये डीजे वाजल्यास कारवाई होणार - पोलीस निरीक्षक विलास पुजारी

शेवगाव तालुक्यामध्ये डीजे वाजल्यास कारवाई - पोलीस निरीक्षक विलास पुजारी .

 

 

आव्हाणे बु :- लग्न समारंभ व विविध कार्यक्रमात डीजेचा धूमधडाका मोठया प्रमाणात चालू असल्याने अनेकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता डीजेवर बंदी आणल्याने डीजे वाल्यानी चागलाच धसका घेतल्याने यापुढे शेवगाव तालुक्यात डीजे वाजल्यास पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागणार असून शेवगाव तालुका डीजे मुक्त करणार असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले आहे.

 

 

            शेवगाव तालुक्यात सध्या लग्नसराई व विविध कार्यक्रमध्ये डिजेच्या तालावर तरुण पिढी मोठया प्रमाणात नाचत आहे. परंतु डीजेच्या कर्णकर्कक्ष आवाजाने जुन्या झालेल्या इमारती व वयोरुद्धासह अनेक लोकांच ह्रदयावर त्याचा परिणाम होत असल्याने शेवगाव तालुक्यात यापुढे आजपासून डीजे वाजणार नसल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यानी शेवगाव तालुक्यातील 40 डीजे मालकांना आदेश व सूचना दिलेल्या असून डीजे वाजल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याने तालुक्यात यापुढे कुठल्याही कार्यक्रमात डीजे वाजणार नाही. लग्न समारंभामध्ये डीजेचा कर्णकर्कक्ष आवाजामुळे अनेक लहान थोरांना यापासून त्रास होत आहे, परंतु कोणीही याची दखल घेत नसल्याने अखेर पोलिसांनी दखल घेऊन त्यांच्यावर बंदी आणण्याची वेळ आली असल्याने शेवगाव पोलिसांनी एका डीजे मालकावर कारवाई करून डीजे शेवगाव पोलिसांनी जप्त केला आहे. शेवगाव तालुका डीजे मुक्त करणार असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केल्याने डीजेवर नाचणाऱ्या तरुणांसह डीजे मालकांनी धसका घेतल्याने आता डीजेचा धूमधडाका बंद होणार आहे. या निर्णयचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.