माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या उपोषणाला प्रहारचा पाठिंबा, पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी - सुरेशराव लांबे .

पुतळ्याची विटंबना दोषीवर कारवाईसाठी प्राजक्त तनपुरेंच्या उपोषणाला प्रहारचा पाठिंबा-सुरेशराव लांबे
शहरातील बुवासिंद बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची झालेली विटंबना प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मा. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकारामुळे संपूर्ण राहुरी तालुक्यात तीव्र जनआक्रोश निर्माण झाला असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
या घटनेला आज १९ दिवस उलटून गेले असूनही अद्यापपर्यंत तपासात काहीच निष्पन्न झाले नाही, दोषींविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत दुःखद व चिंता निर्माण करणारी आहे.या निष्काळजीपणामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी, राजकीय पक्षांनी तसेच शिवप्रेमी नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊन कठोर कारवाईची मागणी प्रहार चे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश राव लांबे व क्रांती सेनेचे मधुकर म्हशे यांनी केली आहे.
पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे अद्याप या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आज पासून शहरातील शनी चौक येथे मा. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.या उपोषणास राहुरी प्रहार जनशक्ती पक्षाचा व क्रांती सेनेचा जाहीर पाठिंबा राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे, क्रांती सेनेचे मधुकर म्हसे साहेब, रमेशराव खेमनर साहेब, माळवदे, विजय बोर्डे, विक्रम कुमार गाढे. यांनी दिला,