*दक्षिण नागपूर मधील महाकाली नगर झोपडपट्टी तील आगीच्या दुर्घटनाग्रस्त प्रत्येक कुटुंबाला सरकार कडून 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्याच्या यावे*
1.
*दक्षिण नागपुर मधील महाकाली नगर झोपडपट्टी तील आगीच्या दुर्घटना ग्रस्त प्रत्येक कुटुंबाना सरकार कडुन 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्याच्या यावे * बि.पि.एस. लाईव्ह न्युज दिल्ली नागपूर - महाकली नगर झोपडपट्टी यांना सरकार कडुन मदत मिळावी म्हणून मागणीकरिता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री,विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारींना बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दक्षिण नागपुरातील बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टी ला सोमवारी सिलिंडर च्या स्फोटामुळे भिषण आग लागली.या आगीत 100 च्या वर झोपड्या जळून राख झाल्या.त्यामुळे दुर्घटना ग्रस्त कुटुंबा जवळ फक्त आगंवरच्या कपड्या व्यतिरिक्त काहीच शिल्लक रहात नाही.घटनेच्या ठिकाणी नागपूर शहराचे पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हाधिकारी आर.विमला यांनी भेट दिली.परंतू कुठल्याही प्रकारची आर्थीक मदत सरकार कडुन अजुनही दुर्घटना ग्रस्ताकरिता जाहिर झाली नाही.म्हणुन दक्षिण नागपूर विधानसभा,बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री,विभागीय आयुक्तव जिल्हाधिकारींना प्रती कुटुंब कमीत कमी पाच लाखाची आर्थीक मदत सरकारने द्यावी या मागणी चे निवेदन देण्यात आले.*या प्रसंगी बसपा प्रदेश महासचिव नागोरावजी जयकर,प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे,जिल्हा प्रभारी नितीनजी शिंगाडे,जिल्हाअध्यक्ष संदीपजी मेश्राम,जिल्हामहासचिव प्रतापजी सुर्यवंशी,शहर उपाध्यक्ष शादाबजी खान,मनपा बसपा गटनेते जितेंद्रजी घोडेस्वार,माजी प्रदेश सचिव उत्तमजी शेवडे,माजी नगरसेवक संजय जयस्वाल,राजुजी चांदेकर, दक्षिण नागपूर अध्यक्ष सुरजजी येवले,दक्षिण नागपूर उपाध्यक्ष प्रितम खडतकर,दक्षिण नागपूर महासचिव विकासजी नारायणे व भाणुदासजी ढोरे* उपस्थित होते.अश्या प्रकारच्या घटना घडल्या वर सरकार ताबडतोब आर्थीक मदत जाहिर करुन दुर्घटना ग्रस्तांना मदत करते परंतु इतकी गंभीर घटना घडल्या वरही महाविकास आघाडी सरकारचे पालकमंत्री व प्रशासन इतके वेळ काढू स्वाभावाचे का वागत आहे ? असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे.या घटनेमुळे सर्व स्तरावरुन हळहळ व्यक्त होत आहे.सामाजिक संस्था आपआपल्या परीने जेवन,कपडे,धान्य व भांड्याची सोय करत आहे.
या देशात मोठमोठ्या उद्योगपती चे हजारो कोटी चे कर्ज सरकार एका झटक्यात माफ करते आणि तेच उद्योगपती मग जगातील सर्वात श्रीमंताच्या श्रेणीत जाऊन बसतात हे या देशाचे कुशासन आहे.गरिब बहुजन समाज मिठासारख्या अनेक वस्तु खरेदी करुन सरकारला अप्रत्यक्ष पणे हजारो कोटींचे कर देतो त्यातुन आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालते असे अठराव्या शतकात महात्मा जोतिबा फुलेंनी तत्कालीन सरकार ला ठणकावून सांगितले होते.
आता तरी सरकारने जाग होऊन महाकाली नगर झोपडपट्टी तील दुर्घटना ग्रस्त कुटुंबाना आर्थीक मदत जाहिर करावी अशी मागणी सर्व स्तरावरुन करण्यात येत आहे.