जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे बु.येथे कै .कॉम्रेड बाबुराव थोरात यांची 51 वी पुण्यतिथी साजरी .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे बु.येथे कै .कॉम्रेड बाबुराव थोरात यांची 51 वी पुण्यतिथी साजरी .

कै.काॅम्रेड बाबुराव थोरात यांची ५१ वी पुण्यतिथी साजरी..!!

 राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडांबे बु.॥ येथे सोमवार ता.२१  फेब्रुवारी रोजी काॅम्रेड बाबुराव थोरात यांची ५१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी श्री.कचरे साहेब हे होते. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर खडांबे बु. वि. वि. का.सो. चे. स्विकृत संचालक मारूती गायके, खडांबे बु. वि.वि.का.सो.चे संचालक श्री. बाबासाहेब तांबे, अॅड. सुरेशराव ताकटे, श्री.भाऊसाहेब ताकटे, सरपंच कैलास पवार वरवंडी (मुळानगर) ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री. अंकुशराव बर्डे श्री. माने आदी. मान्यवर उपस्थित होते.

      यावेळी बोलताना श्री. कचरे म्हणाले की कै. काॅम्रेड बाबुराव थोरात यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून खडांबे गावाचे नाव राज्यभर गाजविले. श्री. मारूतीभाऊ गायके यांनी सांगितले की बाबुराव थोरात यांच्यासारखे व्यक्तीमहत्त्व आमच्या गावाला मिळाले ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आजही तालुक्यातील गावात गेल्यावर कै. थोरात यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्याचे कौतुक करतात. 

   श्री. ताकटे यांनी सांगितले की कै. काॅम्रेड बाबुराव थोरात यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व या गावाला ना भुतो ना भविष्य होऊ शकणार नाही. यावेळी श्री. माने, श्री. अण्णासाहेब थोरात, श्री. बेलदार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

काॅम्रेड बाबुराव थोरात यांचे नातू श्री. विकास थोरातसर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

        या कार्यक्रमप्रसंगी श्री. आदिनाथ ताकटे, श्री. अरूण जाधव, श्री. अशोकराव थोरात, श्री. विजयराव थोरात, श्री. रतन भालेराव, श्री. नानासाहेब साळे, श्री. विक्रांत क्षीरसागर, श्री. गणेश क्षीरसागर, यांच्यासह महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुञसंचालन शाळेचे मुख्याध्यापक पानसंबळ सर यांनी तर आभार प्रदर्शन बेलदार सर यांनी केले.