जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव च्या वतीने मोहनलाल चोपडा बालमंचं लोकार्पण सोहळा व कला अंकुर स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव या ठिकाणी स्व. मोहनलाल गिरीधरलाल चोपडा यांनी दिलेल्या मोहनलाल चोपडा बालमंच (स्टेज)या वास्तूचा लोकार्पण सोहळा व शाळेच्या वतीने कला अंकुर जल्लोष स्नेहसंमेलन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
हा सोहळा ह भ प गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक शिक्षणभूषण पुरस्कर्ते बाजीराव शंकरराव मुंगसे (अण्णा) हे होते.
बालमंचाचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन रिबीन कापून झाले तर कलांकुर जल्लोष स्नेहसंमेलन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने मान्यवराचा सन्मानही करण्यात आला.
यावेळी शाळेतील बालकलाकारांनी नाटिका ,मूक अभिनय ,धार्मिक गीते, गायन, शिव पोवाडा, महात्मा फुले जीवनगाथा, शूरवीर झाशी की राणी, पारंपरिक गजढोल, गजनृत्य, लोकनृत्य या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा, स्री जन्माचे स्वागत करा ,वाईट कृत्या पासून दूर राहा ,छत्रपती शिवरायांचा पोवाडा ,समाजामध्ये जनजागृती , व्यसनमुक्ती संदेशाची नाटिका, सर्व धर्म समभाव, मित्राची संगत,असे अनेक संदेश या सांस्कृतिक कार्यक्रमातून आलेल्या प्रेक्षकांना पहावयास मिळाल्याने प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
कलांकुर सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर बथूवेल हिवाळे सर, दत्तात्रय धामणे सर , अश्विनी कदम मॅडम, तेजश्री निमसे मॅडम, कविता करंडे मॅडम , यांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी पालकांचे ही सहकार्य लाभले.
या यशस्वीरित्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांनीही शुभेच्छांचा बक्षिसांचा वर्षाव करत या लहान चिमुरड्या कलाकारांना टाळ्यांची दा
द दिली.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड साहेब , अहिल्याबाई होळकर शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड, भोसले गुरूजी, अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्ह्याचे नेते बाळासाहेब कदम,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, ,बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने, युवा नेते आकाश चे डे , बालाजी युवा मंचाचे पोपट बनसोडे, श्रीकांत हिवाळे ,पास्टर माणुवेल हिवाळे, व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, माजी अध्यक्ष दत्ता मुंगसे शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष सोपान मुंगसे, उपाध्यक्ष अन्वर सय्यद, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी, राज पतसंस्थेचे चेअरमन संतोष टांगळ, भारत औटी ,दिलदार सय्यद, पत्रकार विष्णु मुंगसे, तालुक्यातील शिक्षक सहकारी शिक्षक नेते शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद विविध संघटनेचे, शाखेचे पदाधिकारी व आदी पालक,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कदम मॅडम व तेजश्री निमसे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर यांनी मानले.