*राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब यांचे मास्क वापरण्याचे आवाहन*
बी पी एस राष्ट्रीय न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी.(ता बार्शी) मुंबईसह पुण्यात कोरोना ची संख्या वाढ
होत असलेल्या कारणाने नागरिकांना खबरदारीचे आवाहन.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला आव्हान केले
आहे की कोरोना हा कमी जरी झाला असला तरी पुन्हा कमी
वेगाने का होईना त्याचा प्रसार वाढत आहे त्यामुळे खबरदारी
म्हणून राज्यातील नागरिकांनी मास्क वापरावे असे आवाहन
गुरुवारी ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळाच्या
बैठकीत चर्चा करून कोरोनाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये
मुंबईसह पुण्यात व इतर ठिकाणी कोरोनारुग्ण संख्याची कमी
प्रमाणात वाढत असल्याचे माहिती घेण्यात आली. सध्या एक ते
दोन रुग्ण व्हेंटिलेटर वर असून 22 जणांवर उपचार सुरू
असल्याचे सांगितले जात आहे. जरी कोरोना कमी झाला असला
तरी त्याचे खबरदारी घेणे गरजेचे आहे. रुग्णांमध्ये वाढ होण्याची
शक्यता होत असल्यामुळे मास्क जरूर वापरावे असे आवाहन
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचप्रमाणे राज्यात
कमी झालेल्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या.
त्यांनी या यंत्रणेची नव्याने उभारणी करण्याची गरज आहे असेही
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले.