जिल्हा प. कलंभा शाळेत शाळापूर्वतयारी मेळावा संपन्न

1.

काटोल:- जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शासन विवीध योजना व उपक्रम सातत्याने राबवित असते. शाळेत नविन प्रवेशपात्र विद्यार्थ्याला शाळेची ओढ लागावी यासाठी मागील वर्षीपासुन शाळापूर्वतयारी मेळावा आयोजित करावा असे निर्देश आहेत. सध्या विवीध उपक्रमात परिचीत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा कलंभा शाळेत नुकताच हा मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन येनवा केंद्राचे केंद्रप्रमुख मोरेश्वर साबळे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा.व्य.समिती अध्यक्ष सिद्धार्थ वाहणे तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते बळवंत नारनवरे होते.

कार्यक्रमाला सदस्य अरविंद चौरे,राजेश शेंडे,ज्ञानेश्वर रक्षित,श्रावण चवरे, उपसरपंच जानराव महाजन इ.सदस्य उपस्थित होते. 'मात्र ग्रामपंचायत कर्मचारिनी या कार्यक्रमाला पाट फिरवीली आहे' कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक घनश्याम भडांगे,सहशिक्षिका ज्योती नारनवरे,लिना काळे, स्वयंसेवक प्रतिक्षा नारनवरे,अंगणवाडी सेविका शशिकला तागडे,इत्यादिंनी परिश्रम घेतले.या मेळाव्यात नविन विद्यार्थ्याकडून विवीध आनंददायी कृती करवुन घेतल्या.शाळेत जास्तीत जास्त मुले प्रवेशित होतील यादृष्टीने प्रयत्न करावे असे आपल्या मनोगतात केंद्रप्रमुख साबळे यांनी सांगितले.