*राज्यात कोरोनाची वाढ; महाराष्ट्रात पंचसुत्री कार्यक्रम राबवा. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे पत्र*

*राज्यात  कोरोनाची  वाढ;  महाराष्ट्रात  पंचसुत्री  कार्यक्रम  राबवा.  वाढत्या  कोरोना  रुग्णांच्या  पार्श्वभूमीवर  केंद्राचे  पत्र*

बिपिएस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

  :- राज्यामध्ये आठवडाभरात 2000 नवीन कोरोना रुग्णांत वाढ.

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य सरकारला यावर पत्र लिहून उपाययोजना करण्याचे सूचना दिली आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या सहा जिल्ह्यातील वाढता कोरोना झपाट्याने वाढत असल्याने पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला उपाययोजनेसाठी पत्र लिहून सूचना दिले आहेत व अधोरेखित केली आहेत.

या सहा जिल्ह्यात कोरोना ची प्रतिबंधक योजना पंचसूत्री कार्यक्रम रावणाच्या सूचना दिल्या आहेत. केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्र लिहिले आहे.

आठवडाभरात राज्यामध्ये कोरोनाची जास्त प्रमाणात वाढ होत असल्याने केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना हे पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोणाच्या वाढत्या प्रमाणामुळे पुढचे संकट दिसून येता त्यावर लवकरात लवकर आळा बसावा म्हणून हे पत्र लिहिले आहे.

गेल्या 15 दिवसापासून कोरोना ची संख्या पंधरा हजारांवर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 2471 नवीन रुग्ण आढळून आले आहेत

वाढते रुग्ण संख्या

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना चे प्रमाण वाढते दिसून आल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला लवकरात लवकर यावर उपाययोजना कराव्यात जेणेकरून वाढते रुग्णांना आळा बसावा असे या पत्रात नमूद केले आहे.

अशा आहेत सूचना

- कोविड काळात योग्य वर्तन

- नव्याने होणाऱ्या covid-19 च्या प्रकरणावरील अतिशय बारकाईने लक्ष

- मार्गदर्शन केल्याप्रमाणे योग्य ते चाचण्या करा-

- संसर्ग पसरत असल्याने आधीच जाणून घेऊन इशारा देण्यासाठी आरोग्य सुविधेच्या ठिकाणी इन्फ्लुएन्झा किंवा संरक्षणाबाबत काटेकोरपणे लक्ष करणे.

अशा प्रकारच्या केंद्र सरकारने पत्राद्वारे माहिती देऊन सूचना दिल्या आहेत.