शेवगाव बस स्थानकाची दुर्दशा. प्रवाशांचे हाल
शेवगाव :- शेवगाव एसटी आगारात प्रवाशांना बसायला पुरेशे प्रवासी शेड नाहीत एसटी आगाराच्या इमारतीचे बांधकाम एकदम चालू आहे.
भाजप सेना युती सरकारने शेवगाव एसटी आगार नवीन इमारतीला मंजुरी दिली होती. आता महा विकास आघाडीच्या राज्यात या इमारतीच्या बांधकामाचा कडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. एसटी कॅन्टींग सह अनेक व्यवसायिकांच्या गाळेधारकांना घरी बसावे लागले त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.
शेवगाव एसटी आगाराच्या हद्दीत बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी असते. त्यामुळे प्रवासी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करतात एसटी कर्मचाऱ्यांचा संप व कोरोना महामारी मुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे. आता कोरूना चे संकट संपले. एसटी कर्मचारी कामावर येतात आगार व्यवस्थापक यांनी एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रवाशांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी प्रवासी शेड मध्ये वाढ केली पाहिजे. एसटी आगार परिसरात संध्याकाळी अंधाराचे साम्राज्य असते प्रवाशांना बसायला व्यवस्था नाही. पाकीटमार भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. एसटी आगार परिसरात कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली तर गुन्हेगारांवर वचक बसेल. शेवगाव तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना नेत्यांनी परिवहन मंत्री ना . अनिल परब यांना भेटून शेवगाव एसटी आगार इमारतीचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली तर प्रवाशांचे हाल होणार नाहीत. नेत्यांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.