काटोल येथे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तक दिन साजरा
1.
भारतीय संविधानाचे रक्षण करणे संपुर्ण भारतीयांची जबाबदारी- दिगांबर डोंगरे
काटोल:- ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पन व अभिवादन व मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे तर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ बोधाचार्य गुलाबराव शेंडे सामाजिक कार्यकर्ते प्रा. विरेंद्र इंगळे आकाश मेश्राम,विजय दहाट वार्षिक पौर्णिमा उत्सव समितीचे संयोजक अनंतराव सोमकुवर सामाजिक कार्यकर्त्या सुषमा सहारे, मिना पाटील, आंबेडकरी कवयत्री, सरीता रामटेके उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीमेसमोर द्वीप प्रज्वलण भिक्षुनी विनय शिलामाताजी यांच्या हस्ते.करून धम्मध्वजाचे ध्वजारोहण दिगांबर डोंगरे गुलाबराव शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रा.विरेंद्र इंगळे, गुलाबराव शेंडे, सुरेशराव देशभ्रतार, आकाश मेश्राम, सुषमा सहारे, प्रतिमा देशभ्रतार व सरीता रामटेके यांनी डॉ.बाबासाहेबांच्या कार्यावर विचार व्यक्त केले.
तर अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना दिगांबर डोंगरे म्हणाले की कठीण परिस्थितीचा सामना करत स्वताच्या परिवाराला सुख न देता उघड्या नागड्या व जातीव्यवस्थेच्या जाळ्यात पडलेल्या भुखमरी अशिक्षित पणा लाचारी गुलामी अपमान व माणुस असुन माणसाचे जिवन जगण्यापासुन वंचित असणाऱ्या घटकांना समानतेच्या धागेणे बांधुन इज्जतीचे जिवन जगण्याची ताकद डॉ. बाबासाहेबानी भारताला दिलेल्या संविधानात आहे. स्वातंत्र्य बंधुता सामाजिक आर्थिक,राजकीय, समानता निर्माण करण्याकरिता नागपूरच्या पवित्र दिक्षाभुमिवर बौद्ध धम्माची दिक्षा 14.ओक्टोंबर 1956 ला घेवुन देशात समता प्रस्तापीत केली संविधानामुळेच भारताची जगाच्या पाठीवर सार्वभौम लोकशाही असणारा देश म्हणून ओळख आहे. म्हणूनच संविधानाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असल्याचे मत दिगांबर डोंगरे यांनी मांडले.
प्रास्तस्वीक.प्रा रमेश येवले यांनी केले तर संचालन अनंतराव सोमकुवर यांनी तर आभार रामराव पाटील यांनी मानले. कार्यक्रामात पांडुरंग खोब्रागडे, बाबाराव गोंडाने, अशोकराव बागडे, जिवन वाहने, बंडू कावळे, दिगांबरराव भगत, विद्या तागडे, प्रितम मेहरे, संभाजी सोनुले,पाटील नारनवरे,राजेंद्र गौरखेडे यांचेसह मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.