पालकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता विद्यापीठ शालेय प्रशासनाला सहकार्य करावे : - सचिव डॉ.महानंदा माने .
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सीबीएसई पॅटर्न अंतर्गत कार्यरत असलेली इंग्रजी शाळा काही कारणास्तव चर्चेत आली आहे .विद्यार्थ्यांच्या पालकांनी मीडियासमोर शाळेच्या तक्रारींचा पाढा मांडला होता .या सर्व तक्रारींची दखल घेऊन सर्व समस्यांचे त्वरित निवारण करण्याचे आश्वासन महानंद माने यांनी दिले आहे .
सध्या वातावरण खराब असल्यामुळे शाळेतील काही शिक्षकांना आरोग्य विषयक समस्या जाणू लागल्यामुळे तीन ते चार शिक्षक शाळेत न आल्याचे पाहून इंग्रजी शाळा बंद पडणार अशी अफवा काहिंनी पसरवली होती .त्यामुळे पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता .सीबीएसई पॅटर्न की बोर्ड याबाबतही पालकांच्या मनात शंका आल्याने याबाबतची लेखी तक्रारही शालेय शिक्षण मंडळाकडे करण्यात आली होती .लवकरच सीबीएसई पॅटर्नची मान्यता मिळणार असून पालकांनी घाबरून जाऊ नये . तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तात्काळ निर्णय घेण्यात आला असून येत्या चार दिवसात सर्व पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे BPS LIVE NEWS शी बोलताना त्यांनी सांगितले आहे .
सध्या शाळेचे कामकाज सुरळित होत असून कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे .महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच योग्य ती कारवाई सुरू आहे .शाळा व्यवस्थापन कमिटी पालकांच्या मागण्यांशी सदैव बांधील आहे .परंतु कोणत्याही चुकीच्या अफवांना व चर्चेला पालकांनी बळी पडू नये व संस्थेला बदनाम करू नये असे आवाहनही यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर महानंद माने यांनी केले आहे .