कॅथोलिक चर्च टिळकनगर, येथे शनिवार दिनांक 23 मार्च व रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी उपवास काळातील आराधना आरोग्य दानाच्या प्रार्थना सभेचे आयोजन टिळक नगर धर्मग्रामाच्या वतीने करण्यात आले .

   श्रीरामपूर  ( टिळकनगर )  :- ४० दिवसाच्या उपवास काळात सर्व ख्रिस्ती बंधू- भगिनी परमेश्वराची  स्तुती आराधना करतात. कॅथोलिक चर्च टिळकनगर, येथे शनिवार दिनांक 23 मार्च व रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी उपवास काळातील आराधना  आरोग्य दानाच्या प्रार्थना सभेचे आयोजन टिळक नगर धर्मग्रामाच्या वतीने करण्यात आले होते. या आरोग्यदानाच्या प्रार्थना सभेसाठी पॉपुलर मिशन अहमदनगर केडगाव येथील डिवाइन आश्रम चे फादर थॉमस टकेकरा व टीमने या दोन दिवशी प्रार्थना सभेमध्ये उपस्थित भाविकांना परमेश्वराचे वचन समजावून सांगितले.  विश्वास ठेवून आपण आपले जीवन जगा व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या अशा शब्दात फादर थॉमस यांनी उपस्थितत भाविकांना आपल्या प्रवचनातून मार्गदर्शने केले. या प्रार्थनेसभेसाठी टिळकनगर धर्मग्रंमातील खेडेगावातील व परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या दोनही दिवस भाविकांसाठी अन्नदान प्रितीभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

               रविवारी झावळयाचा सण मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला व नंतर आरोग्यदानाची प्रार्थना करण्यात आली. यावेळी फादर थॉमस व टीमचा धर्मग्रंमाच्या वतीने, फादर मायकल वाघमारे, फादर संजय पठारे, सिस्टर उषा, सिस्टर पूनम, सिस्टर सुचिता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दोन दिवस अन्नदान करणाऱ्या दानशूर भाविकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रार्थना सभा यशस्वीतेसाठी पॅरिस कौन्सिलचे सर्व सदस्य व भाविकांचे सहकार्य मिळाले.