१०१ झाडे लावून जगवणार असा अनोखा संकल्प करुन केला वाढदिवस साजरा.

१०१ झाडे लावून जगवणार असा अनोखा संकल्प  करुन केला वाढदिवस  साजरा.

बालाजी देडगाव ( प्रतिनिधी युनूस पठाण )नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथिल देडगाव , माका ,पाचुंदा परिसरातील महापावन गणपती या देवस्थानचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे यांनी अनावश्यक खर्च टाळून स्वतः स्व खर्च करून सात ते आठ फूट उंचीची १०१ अशोकाची झाडे लावून वाढदिवस साजरा केला.

          प्रथमतः हा १०१झाडे लावण्याचा कौतुकास्पद ,स्तुत्य उपक्रम महापावन गणपती परिसरामध्ये देवस्थानचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

      यावेळी महापावन गणपतीचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे, महावितरण चे कर्मचारी हंडाळ साहेब, व बालाजी फोटोग्राफीचे संचालक नवनाथ मुंगसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

     हा कार्यक्रम देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पठाडे मेजर यांनी केले .तर यावेळी बोलतांना म्हणाले की, संभाजीराव यांनी केलेला स्तुत्य उपक्रम हा वाखण्याजोगा आहे. प्रत्येक तरुणांनी या गणपती परिसरामध्ये येऊन एक तरी झाड लावावं व त्याचा संभाळ करावा. या आगोदर ही १११ वडाची झाडे लावून या परिसरातील शोभा वाढवण्याचे व निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे अशी संकल्पना मांडली व तरुणांनी वाढदिवसासाठी लागणारा अनावश्यक खर्च टाळून या वाढ दिवसा सारखे कौतुकास्पद उपक्रम करावेत.

        सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे बोलतांना म्हणाले की, एक सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून या परिसरामध्ये झाडे लावून या परीसरात शुशोभीकरण करून या परिसरातील भौतिक विकास केला आहे. व या गणपतीला पुढील काळामध्ये वडाचा गणपती असे म्हणण्यात येईल ही या झाडाची खरी महत्वकांक्षा आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल म्हणुन झाडे लावून ती १००% जगवावी असे म्हणत आपण सर्वजण या परिसराचा विकास करू अशी ग्वाही देत शुभेच्छा दिल्या.

     यावेळी प्रगतशील बागातदार शेतकरी भाऊसाहेब मुंगसे , मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे,चालक-मालक संघटनाचे अध्यक्ष विश्वासराव हिवाळे ,कांदा व्यापारी देविदास रक्ताटे, नवनाथ रक्ताटे ,गणेश बनसोडे, बापू कुटे, भैया हिवाळे, बालाजी अकॅडमीचे तरुण युवक व पाचुंदा माका देडगाव परिसरातील आदी मान्यवर उपस्थित होते.

      या स्तुत्य उपक्रमाचे परिसरामध्ये कौतुक होऊन अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर, या कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुंगसे यांनी मा

नले.